विद्रूपा नदीपात्रात सोडण्यात आले पाणीपंचायत समिती सदस्य बेबीताई जनार्धन गायकवाड यांचे प्रयत्नाला यश
विद्रूपा नदीपात्रात सोडण्यात आले पाणी
पंचायत समिती सदस्य बेबीताई जनार्धन गायकवाड यांचे प्रयत्नाला यश
बार्शीटाकली प्रतिनिधी
*सौ.बेबीताई जनार्दन गायकवाड* यांनी दि.१९/०४/२०२२ *रोजी विद्रुपा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला यांना निवेदन देण्यात आले होते*
बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप आळंदा येथील नदी कोरडी झाल्याने या भागातील जनावरांचे हाल होत होते त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत ना होते सदर समस्या बाबत जानवी ठेवून या भागातील पंचायत समिती सदस्य बेबीताई जनार्धन गायकवाड यांनी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला यांनी दखलघेतली व कान्हेरी सरप पंचायत समिती सर्कल मधील गावे *आळंदा ,रुस्तमाबाद , कान्हेरी सरप ,* या गावांनमधुन वाहनारी विद्रुपा नदी कोरडी वाहत होती *त्यामुळे गुर ढोर यांना पाण्यासाठी वनवन हिंडावा लागत होत* ही समस्या लक्षात घेता *सौ.बेबीताई जनार्दन गायकवाड पं.स.सदस्य कान्हेरी सरप* यांनी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला यांच्या समस्या लक्षात आणून दीली व वेळोवेळी पाठपुरावा करून दगडपारवा प्रकल्पातुन विद्रुपा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला यांनी समस्या निवारण केली सौ.बेबीताई जनार्दन गायकवाड यांनी केलेल्या कामाची कान्हेरी सरप,रूस्तमाबाद,आळंदा,या गावांतील लोकांनी आनंद साजरा करत आभार व्यक्त केले आहे पंचायत समिती सदस्य बेबीताई जनार्धन गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे या भागातील गुराढोरांना पिण्यासाठी पाणी मिळाले आहे
Comments
Post a Comment