बार्शिटाकळी येथे स्व. गाडेकर महाराजांना श्रद्धांजली अर्पण........
बार्शिटाकळी येथे स्व. गाडेकर महाराजांना श्रद्धांजली अर्पण........
प्रतिनिधी , बार्शिटाकळी ,
अखिल मानवाला बंधुत्वाचा, सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता तत्वज्ञानाचा गावोगावी जाऊन प्रचार प्रसार करणारे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आजिवन प्रचारक, राष्ट्रीय किर्तनकार प्रबोधनकार श्री उद्धवराव गाडेकर महाराज यांचे ११ मे रोजी देहावसान झाले. त्या मुळे श्री गुरुदेव सेवा मंडळामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.स्व उद्धवराव गाडेकर महाराज हे आपल्या स्पष्ट वक्ता व निर्भीडपणे कीर्तनातून समाजाला जागृत करण्यासाठी आजिवन धडपडत होते त्याचप्रमाणे दरवर्षी पाटसुल आश्रम येथे बाल सुसंस्कार शिबिर घेऊन त्यांनी हजारो विद्यार्थी सुसंस्कारीत केले आहेत. आजही त्यांचा मुलगा डॉ शिवदास गाडेकर ही परंपरा चालवत आहे. दि. १२ मे गुरुवार रोजी बार्शिटाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सामुदायिक प्रार्थना मंदिरामध्ये बार्शिटाकळी तालुका कार्यकारिणी चे वतीने त्यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुरुवातीला सामुदायिक प्रार्थना घेऊन त्या नंतर श्री दिपक दादा लुंगे यांनी स्व गाडेकर महाराजांच्या जीवन कार्याला उजाळा दिला व त्या नंतर दोन मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रचार प्रमुख तथा जिवन प्रचारक डॉ अशोक रत्नपारखी, तालुका प्रचार प्रमुख देविदास कावरे, जिल्हा भजन प्रमुख श्री दिपक लूले, श्री चांदणे साहेब, महादेवराव जगताप, राजेश मोहोड, संतोष झरकर तथा बार्शिटाकळी शहर व परिसरातील बहुसंख्य गुरुदेव सेव वकांची उपस्थिती होती. शांती पाठ,आरती, जयघोष घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. अशी माहिती श्री गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री जेठाभाई पटेल यांनी दिली.
छाया , गुरू देव सेवा मंडळ ची मंडळी श्रद्धाजंली वाहतांऩा ,
Comments
Post a Comment