लखन इंगळे यांच्या नेतृत्वात घरकुलाच्या लाभार्थी सह न.प.मुख्यअधिकारी आकोट वर विविध मागण्यासाठी हल्ला बोल आंदोलन........

लखन इंगळे यांच्या नेतृत्वात घरकुलाच्या लाभार्थी सह न.प.मुख्यअधिकारी आकोट वर विविध मागण्यासाठी हल्ला बोल आंदोलन 

आज लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या नेतृत्वात नगर परिषद मुख्यअधिकारी आकोट यांना आकोट शहारातील पेंडिंग असलेले कामांच्या विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले 
आकोट नगर परिषद मध्ये बऱ्याच वर्षां पासुन रमाई घरकुल /प्रधानमंत्री घरकुल हे राबविली जात असुन पण ही योजना राबवित असतांना निधी नसल्याने किंवा काही आणखी अडचण असल्यामुळे गरीब लाभार्थी यांना फार अडचण निर्माण होत आहे करिता आमच्या खालील मागण्या वरील आपल्या स्तरावर पूर्ण करण्यात याव्या
1) प्रधानमंत्री घरकुल योजनेचा मंजूर DPR 514,180,206,101,याचा निधी उपलब्ध करून लाभार्थी यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा .
2) रमाई घरकुल चे लाभार्थी यांचे अर्ज 2011पासुन तर आज 2022 परियंत निधी अभावी रखडून पडले आहेत त्या करिता नवीन निधी मागवुन गरजु लोकांना घरकुलचा लाभ देण्यात यावा.
3) गुंठेवारी धारक लाभार्थी यांचे अर्ज निकाली काढण्यात यावे कारण त्यांना घरकुल योजनेचा लाभ तोरीत घेता यावा.
4) आकोट शहारातील निवासी अतिक्रमण धारक लाभार्थी यांच्या जागा कायम स्वरूपी पट्टे बहाल करण्यासाठी लाभार्थी यांनी दिलेल्या फायली /अर्ज नगर परिषद आकोट येथे पडून आहेत ते निकाली काढण्यात याव्या कारण अस्या लाभार्थी यांना घरकुलचा लाभ घेता येईल.
5) आकोट शहारा मध्ये नागरी पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती काही ठिकाणी वाटर सप्लाय चे काम ठेकेदार कडून निकृष्ट दरज्याचे झाले असुन जसे राहुल नगर आकोट मध्ये झालेले वारंवार पाईपलाईन लिकीज होत आहे आहे असे अनेक ठिकाणी पाईपलाईन गाड झालेली आहे आहे याची चौकशी करून संबंधित ठेकेदार कडून काम पुन्हा करून घेण्यात यावे व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
6) आकोट शहरातील प्रत्येक प्रभागातील मंजुर झालेले दलित वस्ती चे कामाचे टेंडर झालेले असुन कामे तोरीत चालू करण्यात यावे. आदि मागण्या सह सेवेशी निवेदन देण्यात आले.
 वरील आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास गोरगरीब जनतेच्या हितासाठी आम्ही प्रधानमंत्री घरकुल /रमाई घरकुल /गुंठेवारी/धारक/अतिक्रमण धारक योजनेच्या लाभार्थी सह आपल्या कार्यालय समोर तीव्र आंदोलन /मोर्चे /उपोषण करू आपण याची गांभीर्याने दखल घ्यावी काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी आसा इशारा लखन इंगळे यांनी मुख्यअधिकारी यांना दिला आहे सोबत विलास तेलगोटे , समीर पठाण , नितीन तेलगोटे , विक्की तेलगोटे , इम्रान पठाण , मिलिंद थोरात , प्रकाश गवई , रामेश्वर सरकटे  ,विजय वाघमारे , प्रतीक तेलगोटे , नवनीत तेलगोटे , सुगत तेलगोटे , अब्रार पठाण , सुभाष जामनिक , ज्ञानेश्वर नाठे , दिपक तेलगोटे , प्रशांत तेलगोटे , राजरतन तेलगोटे , सचिन सरकटे , सुरज वानखडे , विजय ठाकरे , नारायण राऊत , रमेश बुंदले , रमेश शिंगाडे ,योगेश दवंडे ,कैलास मोरोदे, पांडुरंग दवंडे ,दिपक अंभोरे, अजय वाघमारे, संतोष अंभोरे , रोहित दांडगे यांचे नावे व सह्या आहेत . 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे