बार्शीटाकळी ची पाणी पुरवठा योजनेचे टेंडर (निवीदा) लावण्यास नगर पंचायत प्रशासना कडुन दिरंगाई "बार्शीटाकळीच्या जनतेला हक्काचे पाणी केव्हा मिळणार" ?
"बार्शीटाकळी ची पाणी पुरवठा योजना चे टेंडर (निवीदा) लावण्यास नगर पंचायत प्रशासना कडुन दिरंगाई "
बार्शीटाकळीच्या जनतेला हक्काचे पाणी केव्हा मिळणार ?
बार्शीटाकळी:
नगर पंचायत बार्शीटाकळी प्रशासनाची जबाबदारी आहे की नागरिकांना दैनंदिन सोईसुविधा पुरवणे क्रमप्राप्त आहे. याच अनुषंगाने नगर पंचायत बार्शीटाकळी यांनी पाणीपुरवठ्याचा विषय ठरावाद्वारे पारित केला . त्याबाबत सतत पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना मंजुर करून आणली. आता ह्या घटनेला ५६ दिवसाचा कालावधी उलटून गेला आहे आणि आता आज पासून फक्त ३४ दिवस ऊरले आहेत या ३४ दिवसा मध्ये टेंडर प्रकिया पुर्ण करुन ज्या कोणत्याही ठेकेदार चे टेंडर खुलेल त्या ठेकेदार ला कार्यारंभ आदेश द्यावा लागेल असे बार्शीटाकळी पाणी पुरवठा मंजुर योजणे च्या जी आर मध्ये नमुद आहे.
वास्तविक पाहता प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ७ दिवसांत सदर कामाची निविदा निघायला पाहिजे. पण तसे झाले नाही म्हणून बार्शीटाकळीच्या ११ नगरसेवकांनी, मुख्य्याधिकारी ,जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे माहितीस्तव तक्रार दाखल केली. त्यामध्ये १) सुरेश जामनिक उपाध्यक्ष २) सुनिल विठ्ठलराव शिरसाठ आरोग्य सभापती ३) शबनम परविन अशपाक शाह ४) श्रावण रामदास भातखडे ५)कमलाबाई शंकर धुरंधर ६) अरशद खान अन्सारखान ७) ईफतेखारोदीन काझी ८) विनोद राजाराम राठोड ९) सौ. छाया राजेश साबळे १०)सौ. जयश्री रमेश वाटमारे ११) साबीया परविन सै. अबरार यांच्या सह्या आहेत. सदर टेंडर लावण्यास का विलंब होत आहे हे कळायला मार्ग नाही. गेल्या ५६ दिवसा मध्ये पाणी पुरवठाचे टेंडर (निवीदा) का लागले नाही? याला कारणीभूत कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागरिकांना सोईसुविधा पुरवण्यात दिरंगाई करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बार्शीटाकळी नगर पंचायत चे सह्या करणारे ११ नगरसेवक यांची मागणी आहे.
Comments
Post a Comment