अकोला जिल्ह्याचे वाढत असलेले तापमान कमी करण्याचा निसर्ग कट्टा व गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचा एक प्रयत्न

अकोला जिल्ह्याचे वाढत असलेले तापमान कमी करण्याचा निसर्ग कट्टा व गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचा एक प्रयत्न.

बार्शी टाकळी (तालुका प्रतिनिधी)

वनाबद्दलच्या प्रेमातून वृक्षलागवडीच्या संकल्पनेतून तसेच जिल्ह्यातील वाढत चाललेले तापमान जर कमी करायचे असेल तर देशी झाडांची भरपूर प्रमाणात लागवड केल्याशिवाय पर्याय नाही. ही बाब लक्षात घेऊन तापमान कमी करण्यासाठी निसर्ग कट्टा व वनस्पतीशास्त्र विभाग, गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शी टाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बॉल बनवून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करण्यात केला. यामध्ये अर्जुन, कांचन, सागवान, कडू बदाम, चिंच, सीताफळ, सुबाभूळ, चिकू, व लिंब अशा अनेक देशी झाडांच्या बिया विद्यार्थ्यां मार्फत जमा करण्यात आल्या. निसर्ग कट्टा चे संस्थापक श्री. अमोल सावंत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक माती, शेणखत आणि झाडाचा पाला पाचोळा यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून सिड बॉल बनवण्यात आले. या कार्यक्रमात वनस्पतीशास्त्र विभागातील 44 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून जवळपास 1000 सीड बॉल ची निर्मिती केली. येणाऱ्या पावसाळ्यात पावसाची ओल अर्धा ते पाऊण फूट जमिनीत गेल्यानंतर तयार करण्यात आलेले सीड बॉल नियोजित स्थळी टाकण्यात येतील व त्यापासून नक्कीच रोपटे तयार होतील असे आश्वासन वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. संतोष सुरडकर यांनी दिले. या सीड बॉल पासून तयार झालेल्या रोपट्यांची काळजी घेणे ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे व त्यांची काळजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा युनिट घेईल अशी ग्वाही महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थापक अध्यक्ष डॉ. मधुकर पवार यांनी याप्रसंगी दिली. या कार्यक्रमाच्या शेवटी श्री. अमोल सावंत यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना निसर्ग कट्टा मार्फत तयार करण्यात आलेले विविध पान पक्षांचे कॅलेंडर वितरीत करून त्यांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमास निसर्गप्रेमी श्री मनोज लेखणार सर तसेच वनस्पती शास्त्र विभागाचे डॉ. विनोद उंडाळ व डॉ. प्रियंका मसतकर , डॉ. सिद्धार्थ वाघमारे , रा.सो.यो. प्रमुख डॉ. दीपक चौरपगार,श्री पंजाब जाधव यांचे सहकार्य लाभले. तसेच याप्रसंगी विज्ञान शाखेचे प्रमुख डॉ. अमित वैराळे, डॉक्टर नीलिमा कंकाळे प्राणीशास्त्र विभाग, प्रा. वैशाली सोनोणे हिंदी विभाग, डॉ. मनोजकुमार देशपांडे संगीत विभाग व प्रा. वैभव धात्रक यांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.सदर कार्यक्रम घेण्यात आल्या मुळे महाविद्यालय चे प्राध्यापक,शिक्केत्तर कर्मचारी तसेच सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे