महात्मा ज्योतिबा फुले यांच्या "तृतीय रत्न" नाटकाच्या प्रयोगाला अलोट गर्दी......शिक्षण हेच सामाजिक उन्नतीचे साधन...........गुलाबराव गावंडे

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या "तृतीय रत्न" नाटकाच्या प्रयोगाला अलोट गर्दी......
शिक्षण हेच सामाजिक उन्नतीचे साधन........... गुलाबराव गावंडे
अकोला

प्राचिन काळापासून समाज हा अनेक अनिष्ट रूढी परंपरा या बंधनात जखडून आपल्या सर्वांगीण उन्नती पासून कोसो दूर होता,अश्या परिस्थितीत त्या त्या काळात शिक्षणा मुळे समाजाला नवसंजीवनी मिळाली नेमके हेच चित्र महात्मा फुले लिखित तृतीय रत्न या नाटकातुन दर्शविली आहे, समाज बांधवांनी या तृतीय रत्न नाटकाचे अवलोकन करून आपली उन्नती साधावी असे आवाहन माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी केले ते महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महा ज्योती ) नागपुर या संस्थेच्या वतीने, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिना निमित्त, लोक जागृती संस्था चंद्रपुर प्रस्तुत, महात्मा ज्योतिबा फुले लिखित, अनिरुद्ध वनकर दिग्दर्शित, "तृतीय रत्न" या नाटकाच्या अकोल्याच्या प्रमिलाताई ओक हॉल येथे आयोजित प्रयोग प्रसंगी बोलत होते, या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्धाटक आमदार अमोल मिटकरी तर प्रमुख अतिथी माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा परिषद सभापती सम्राट डोगरदिवे, ,प्रा डॉ संतोष हुशे, महादेवराव भुईभार, श्रीकांत दादा पाटील, विश्वनाथ कांबळे, मनिष हिवराळे, गजानन नारे, सुधाकर खुमकर, प्रमोद ढोमणे, श्रीमती वनीता राउत, विभागीय संघटक गजानन इंगळे, आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्रा सदाशिव शेळके यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.श्रीराम पालकर, आभार उमेश मसने यांनी केले, हा तृतीय रत्न नाट्य प्रयोग यशस्वी करण्यासाठी विजय उजवणे, ज्योती भवाने, कल्पना गवारगुरू, दीपमाला खाडे , महादेवराव साबे, श्रीकृष्ण बोळे, दिलीप अप्तुरकर, अशोक रहाटे, दिनकर धामनकर, विलास इंगळे, प्राचार्य डॉ किसन मेहरे, विजय इंगळे, पंकज फाले, सुमेध तायडे, बबलु तायडे, मंगला बंड,सह अकोला जिल्हा महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहयोग दिला,

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....