चौथ्या अ.भा. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे रविवार २९ मे रोजी संतनगरी शेगावमध्ये आयोजन

चौथ्या अ.भा. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे रविवार २९ मे रोजी संतनगरी शेगावमध्ये आयोजन 
प्रतिनिधी बार्शिटाकळी

संमेलनाध्यक्ष पदी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. राजेश मिरगे तर स्वागताध्यक्ष पदी उद्योजक विनायक भारंबे यांची निवड

शेगांव जि. बुलडाणा (दिनांक २७ मे ) : वऱ्हाडी साहित्य आणि बोलीभाषा संवर्धन संस्था बार्शीटाकळी जि. अकोला द्वारा संचालित अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच शाखा बुलडाणा यांच्या वतीने चवथ्या अ. भा. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन स्व. भगवान ठग साहित्य नगरी मथुरा लॉन शेगाव येथे रविवार दिनांक २९ मे २०२२ रोजी करण्यात आले आहे. चवथ्या अ. भा. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनायक भारंबे ( प्रसिद्ध उद्योजक) असून संमेलन अध्यक्षपदी जेष्ठ वऱ्हाडी साहित्यिक डॉ. राजेश मिरगे यांची निवड झाली आहे. संमेलनाचे उद्घाटन डॉ. सतिश तराळ (विश्वस्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. 
       उदघाटन सत्राला आमदार संजय कुटे, पुष्पराज गावंडे सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, सौ शकुंतला बूच (नगराध्यक्ष शेगाव) ज्ञानेश्वर पाटील (अध्यक्ष माऊली कृपा इन्स्टिट्यूशन शेगाव) , किरण अग्रवाल (कार्यकारी संपादक दैनिक लोकमत अकोला वऱ्हाड आवृत्ती) , राजेश राजोरे (संपादक दैनिक देशोन्नती बुलडाणा) , डॉ. सुचिता पाटेकर (शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला) , प्रकाश मुकुंद (शिक्षणाधिकारी माध्यमिक बुलडाणा), 
प्रा. सदाशिव शेळके (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल), डॉ. प्रमोद काकडे (जेष्ठ साहित्यिक), हिंमत ढाळे (अध्यक्ष अंकुर साहित्य संघ), किशोर बळी, अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाचे अध्यक्ष श्याम ठक आणि नितीन वरणकार (कार्याध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन सत्राचे संचालन जया भारती आणि प्रकाश गायकी करणार आहेत. 
उद्घाटन सत्रामध्ये अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच प्रकाशित वऱ्हाडी बखर भाग दोन प्रतिनिधिक कथासंग्रह, वऱ्हाड माती कवी श्रीराम वाघ , गावची माती कवी विनायक काळे आणि अदलीभर दाने (दुसरी आवृत्ती) लेखक आबासाहेब कडू यांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाच्या साहित्यिक पुरस्कारांचे वितरण सुद्धा करण्यात येणार आहे. यामध्ये दामोदर काळे यांना 'वऱ्हाड रत्न पुरस्कार', माया दामोदर यांना जीवन गौरव पुरस्कार, प्रवीण बोपुलकर यांना पुष्पराज गावंडे यलाई पुरस्कार आणि साधना काळबांडे यांना स्व. सौ. सुमनबाई ठक स्मृती महिला वऱ्हाड रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. साहित्यकृती पुरस्कारामध्ये आबासाहेब कडू यांच्या तितंबा (लेख), डॉ. रावसाहेब काळे यांच्या वऱ्हाडी बोलीचा भाषाशास्त्रीय अभ्यास (समीक्षा ग्रंथ), अरुणकुमार विघ्ने यांच्या जागल (कवितासंग्रह) , सौ. माधुरी चौधरी यांच्या माह्या जगन्याची ताकत (लेवागन बोलीभाषा) आणि गोपाल शिरपुरकर यांच्या माह्यी परदेस वारी (झाळीबोली) सन्मानित करण्यात येणार आहे. 

       दुसऱ्या सत्रात प्रा. मीना गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली 'वऱ्हाडी बोलीभाषा साहित्य चळवळीची दशा आणि दिशा' या विषयावर परिसंवाद संपन्न होणार आहे यात प्रा.डॉ. शिवाजी नागरे आणि प्रा. डॉ. सुनिल पखाले आपले विचार प्रकट करतील. संमेलनामध्ये अनुराधा धामोडे, तुळशीराम मापारी आणि शिवलिंग काटेकर यांच्या अध्यक्षतेखाली वऱ्हाडी कवी संमेलनाचे तीन सत्र पार पडणार असून यामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील नामवंत वऱ्हाडी साहित्यिकांचा समावेश राहणार आहे. 

वऱ्हाडी बोली भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाने या आधी तीन वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले आहे. दुसऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाला मसाला किंग धनंजय दातार दुबई यांच्यासह भारत गणेशपुरे या कलावंताची उपस्थिती लाभली होती तर तिसरे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी आयोजित केले होते. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाचा 'चिरांगण' हा वऱ्हाडी दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होत असतो. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचातर्फे 'कानोसा' हे वऱ्हाडी न्युज पोर्टल तथा 'वऱ्हाडधन' हे वऱ्हाडी शब्दकोश अँप चालवले जाते. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच कथाकथन कार्यशाळा, वऱ्हाडी लेखन कार्यशाळा, प्रातिनिधिक कवितासंग्रह, संवाद लेखन कार्यशाळा, बोली भाषेवर आधारित चर्चासत्रे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. 

      चवथ्या अ. भा. वऱ्हाडी साहित्य संमेलना च्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. नितीन वरणकार यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या आयोजन समितीमध्ये पुष्पराज गावंडे, सदाशिव शेळके, श्याम ठक, निलेश देवकर, रवींद्र दळवी, निलेश कवडे, महादेव लुले यांचा तर संमेलन नियोजन समितीमध्ये नितीन वरणकार, दिपक सरप, विनायक भारंबे, रतन बघे, श्रीराम वाघ आणि विनायक काळे यांचा समावेश आहे. संमेलनाच्या आयोजनासाठी अ. भा. वऱ्हाडी साहित्य मंचाचे सदस्य परिश्रम घेत आहेत. शेगाव ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाते. अशा पायवन संतनगरीमध्ये वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे साहित्यविश्वात आनंदाचे वातावरण आहे. या वऱ्हाडी साहित्य संमेलनाचा आस्वाद साहित्य रसिकांनी घेण्याचे आवाहन अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाच्या वतीने करण्यात आले आहे..
. छाया , व्हाडी बोली भाषा चे तज्ज्ञ साहित्य कार मंडळी ,

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे