समर्पित मागास वर्ग आयोगाला वंचित बहूजन आघाडी च्या वतीने ओबीसी आरक्षण बाबत ड्राफ्ट सादर
समर्पित मागास वर्ग आयोगाला वंचित बहूजन आघाडीच्या वतीने ओबीसी आरक्षण बाबत ड्राफ्ट सादर
अमरावती -
राज्यात तीस जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास म्हणजेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती जमातींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला एका समर्पित आयोगाला आज वंचित बहूजन आघाडी च्या वतीने अमरावती विभागीय कार्यालयात ओबीसी आरक्षणा बाबत प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर ह्यांचे स्वाक्षरीने ड्राफ्ट सादर करण्यात आला.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदेश महीला उपाध्यक्ष डॉ निशाताई शेंडे, जिल्हाध्यक्ष प्रा शैलेश गवई प्रामुख्याने उपस्थित होते. राज्य सरकारने समर्पित आयोग स्थापन केलेल्या आयोगाने.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दौरा जाहीर केला आहे.२८ मे २०२२ या कालावधीत समर्पित आयोग अमरावती विभागात भागात दौ-यावर आहे.अमरावती येथे शनिवारी २८ मे सकाळी ९.३० ते सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती केवळ दोन तासात पाच जिल्ह्यातील सुनावणी आणि निवेदन स्विकारण्याचा फार्स करण्यात आला.
महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी नागरिकांची जनतेची मते, सूचना जाणून घेण्यासाठी आणि या ठिकाणी काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांची निवेदने स्वीकारण्यासाठी आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला होता.त्यात फारसे गांभीर्य नसल्याचे वंचितला आढळून आले.
आयोगाच्या अनेक उणीवा वर बोट ठेवत वंचितच्या वतीने अध्यक्ष जयंत बांठिया, आयोगाचे सदस्य सचिव पंकज कुमार आणि डॉ शैलेश दारोकार, माजी सनदी अधिकारी गीते, माजी सनदी अधिकारी झगडे, माजी अवर सचिव हमीद पटेल ह्यांचे कडे सादरीकरण करीत ओबीसी आरक्षण ड्राफ्ट सादर करण्यात आला.
Comments
Post a Comment