भव्य आरोग्य शिबीर घेऊन मनसेने केल्या दोन शाखेचा शुभारंभ

भव्य आरोग्य शिबीर घेऊन 
मनसेने केल्या दोन शाखेचा शुभारंभ 


बार्शीटाकळी 
              बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम परंडा व गोरव्हा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेची स्थापना बार्शीटाकळी तालुक्यातील गाव तेथे शाखा मोहिमेंतर्गत संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष पंकज साबळे व उपजिल्हाध्यक्ष सतिष फाले यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष सचिन गालट यांनी केली .

          यावेळी परंडा शाखा अध्यक्ष म्हणून पवन वानखडे पाटिल यांची तर  शाखा उपाध्यक्ष म्हणून वैभव इंगोले यांची तर सचिव म्हणून शंकर काटोले व कोषाध्यक्ष म्हणून चंद्रकांत वानखडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर गोरव्हा शाखाध्यक्ष पदी वैभव भांगे , उपाध्यक्ष पवन खांबलकर , सचिव म्हणून योगेश खांबलकर तर कोषाध्यक्ष म्हणून दत्ता बारड यांची नियुक्ती करण्यात आली .
 
            यावेळी सिया उमेश कोकाटे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर आरोग्य शिबिरात भागोदय आरोग्य व बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या लिंक वर्कर स्कीम अंतर्गत ज्योती गवई मॅडम , सुरजसिंग जाधव , गजानन राऊत , बाळकृष्ण उताने , महेंद्र वानखडे , अर्चना शेगावकर , सचिन इंगळे यांनी सेवा दिली . त्याच प्रमाणे डॉ रुपाली लहाने , डॉ अभिषेक लहाने , डॉ गजानन भगत , शत्रुघ्न जाधव , विठ्ठल कावरे आदिनी सहकार्य केले. सदर शिबिरामध्ये बि पी , शुगर , एच आय व्ही , पांढरा कावीळ , पिवळा कावीळ , डोळ्यांची तपासणी , महिलांचे विविध आजार ,थायरॉईड , ब्लड गृप आदी तपासण्या व औषधोपचार मोफत करण्यात आला .

                 सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे , महानगराध्यक्ष सौरभ भगत , महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबरे , उद्योजक रोहन खरे , डॉ शामकुमार हांडे, शशी हांडे ,मनोज अंबेरे , महिला तालुकाध्यक्ष कल्पना राठोड , संतोष इंगोले , विठ्ठल शेजाळे ,बाळू ठाकरे उपस्थित होते .

               यावेळी गजानन काळे , संदीप गोपनारायन , शिवप्रताप मेघाडे , वैभव कोहर , आकाश पंढरे , अक्षय काटोले ,प्रफुल्ल इंगोले ,शुभम मानेकर, संतोष इंगळे , चिरंजीव मोहिते , दादाराव जाधव , राहुल शिरसाट , निलेश जावळे, अजय मेश्राम, मोमीन पठाण ,योगेश दोड , आदित्य खांबलकर , श्रीकृष्ण घाटे , शुभम खांबलकर, आशिष खांबलकर , नंदकिशोर खांबलकर , अभिजित आंबेकर, हेमंत खांबलकर , राजेश खांबलकर , हरिओम खांबलकर , सत्यम खंडारे , अनिकेत वानखडे , निलेश राठोड , अतुल राठोड , अक्षय चनाप , राम पवार , गणेश खंडवाये ,भगवंता खांबलकर , चेतन चव्हाण आदी मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर आरोग्य शिबिरास रुग्णांना ने आन करण्याकरीता मोफत वाहनांची व्यवस्था उमेश कोकाटे व हांडे जेनेरिकार्ट मेडिसिन स्टोअर मार्फत करण्यात आली होती.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे