शिक्षणावर काळिमा फासण्याची घटना अकोल्यात खळबळ.....

शिक्षणावर काळिमा फासण्याची घटना अकोल्यात खळबळ
मे २२, २०२२
  शिक्षणावर काळिमा फासण्याची घटना अकोल्यात खळबळ 

अकोला - विद्यार्थीनिवर विनयभंग केल्याप्रकरणी चौधरी कोचिंग क्लासेस संचालक वसीम चौधरी याच्यावर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,चौधरी क्लासेसच्या संचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याने अकोला परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चौधरी क्लासेसमधील विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या पालकांनी वसीम चौधरीविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकारामुळं संतापलेल्या शिवसैनिकांनी थेट पोलिस ठाण्यात गर्दी करत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वसीम चौधरीविरोधात गुन्हा दाखल आणि कठोर कारवाई करण्याचा मागणीसाठी आमदार नितीन देशमुख यांच्यासहित शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली. त्यानंतर या प्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलिसांनी सायबर पोलिसां च्या मदतीने पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे.विद्यार्थिनीच्या तक्रार नोंद केली आहे. त्यानुसार पोलिसांनी वसीम चौधरीवर भादंवि कलम ३५४ (अ,ब,ड) विनयभंग करणे, पोस्को कलम नऊ एफ, १० अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करणे आणि आयटी ॲक्ट कलम सहा, सात (ब) मोबाईलवर अश्लिल चॅटिंग करणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेने अकोल्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आरोपी वसीम चौधरीला सिव्लिल लाईन्स पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी अटक केली आहे. पुढील तपास सायबर पोलिसांच्या मदतीने सिव्हिल लाईन्स पोलिस करीत आहेत.
=================================================

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे