नांदेड उत्तरच्या ग्रामीण भागाशी वंचितची नाळ मजबूत करू- फारूक अहमद नांदेड उत्तरची प्रमुख कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न

नांदेड उत्तरच्या ग्रामीण भागाशी वंचितची नाळ मजबूत करू- फारूक अहमद
नांदेड उत्तरची प्रमुख कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न 
 नांदेड:- 2019 च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीसह यापूर्वीसुद्धा नांदेड ग्रामीण भागातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी अॅड बाळासाहेब आंबेडकरांची चळवळ सांभाळली. अलीकडच्या काळात पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संवादामध्ये अंतर पडले होते त्याला अनेक कारणेही असू शकतात. परंतु यापुढे वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तरच्या ग्रामीण भागातील जनतेशी आपली नाळ अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहे. शहरातील जनतेचे जीवन हे ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर यांच्या सेवा व सुविधा यावर अवलंबून आहे. याची जाणीव वंचित बहुजन आघाडीला आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी अनेक संकटाच्या काळात सुद्धा वंचितच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहण्याची निर्भिडपणे भूमिका घेतली. येत्या काळात गाव तिथे शाखा, व घर तिथे कार्यकर्ता निर्माण करण्याच्या दृष्टीने संवाद अभियान राबविण्यात येणार आहे. पक्षाची मजबूत बांधणी करून ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न वंचित आपल्यापरीने उचलणार आहे. 

नांदेड दक्षिण- उत्तर विधानसभा मतदार संघात 55 हजार मतदान पैकी वीस हजाराच्या वर मतदान हे ग्रामीण भागातील जनतेने दिलेली आहेत. याची जाणीव पक्षाला आहे त्यामुळे या मतदारांना वंचित बहुजन आघाडी वाऱ्यावर सोडणार नाही. प्रस्थापितांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता वंचितच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या मतदारांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी इथून पुढे मजबुतीने लढणार आहे असे मत वंचित चे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांनी व्यक्त केले. ते नांदेड उत्तरच्या कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलत होते.
 याप्रसंगी जिल्ह्याचे प्रभारी नागोराव पांचाळ, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष निरंजना आवटे हे उपस्थित होते. बैठकीचे नियोजन सुनील सोनसळे व इतर सहकाऱ्यांनी केले होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे