न.प.आकोट मधील संबंधित अधिकारी व पालकमंत्री यांच्या चुकामुळे दलित वस्तीचे कामे रद्द होण्याच्या मार्गांवरसंबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करा लखन इंगळे यांचा इशारा
न.प.आकोट मधील संबंधित अधिकारी व पालकमंत्री अकोला यांच्या चुकामुळे दलित वस्तीचे कामे रद्द होण्याच्या मार्गांवर
संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करा लखन इंगळे यांचा इशारा
आज लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या नेतृत्वात मा.जिल्हाधिकारी साहेब अकोला
मा.मुख्यअधिकारी नगर परिषद आकोट यांना निवेदन देण्यात आले निवेदन असे होते कि नगर परिषद आकोट मध्ये अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना मध्ये अकोला पालकमंत्री यांनी निधी देणार असल्याचे खोटे आश्वासन दिले पण आज कित्येक महिन्या पासुन निधी दिला /वळती केला नाही या वरून असे लक्षात येते कि अकोला पालकमंत्री यांनी त्यांच्या जऊळील ठेकेदार यांना कामे मिळावे म्हणुन निधी तोरीत न देता कामे पुढे ढकलण्याचे काम करून अशी शेटिंग झालेली असावी या शेटिंग मध्ये नगर परिषद आकोट चे संबंधित अधिकारी आहेत या वरून लक्षात येते याची चौकशी करावी कारण प्रशासकीय मान्यता ही आर्थिक वर्ष 2021/2022 या वर्षी प्रदान करण्यात आलेली आहे परंतु निविदा प्रकाशित आर्थिक वर्ष 2022/2023 करिता प्रसिद्ध करण्यात आली तसेच या संबंधित मंजूर कामाचा निधी हा अद्याप परियंत न.प.आकोट कडे वळती करण्यात आला नाही 2022/2023करिता प्रशासकीय मान्यतेची मुदत वाढ सुद्धा घेण्यात आली नाही मुद्दा क्र.4. प्रशासकीय मान्यते मध्ये नमुद केल्यानुसार सर्व प्रशासकीय मान्यते नुसार निधी नसतांना निविदा काढणे बंधनकारक असतांना न.प.आकोट मधील संबंधित अधिकारी यांनी सर्व अटी शर्ती मुद्दा क्रं.4.चा भंग करून मनमानी प्रमाणे निविदा प्रकाशित केली आहे मुद्दा क्रं. 11प्रशासकीय मान्यते नुसार कामावरील प्राप्त निधी ची तरतूद वर्षाच्या मार्च अखेर पर्येंत खर्च करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची राहील या उलट नवीन आर्थिक वर्षात निविदा प्रकाशित करून मुद्दा क्रं.11 चा भंग करण्यात आला आहे कोणत्याही प्रकारची वाढीव मुदत न घेता निविदा प्रकाशित करण्यात आल्या या वरून असे लक्षात येते कि विनाकारण पालकमंत्री अकोला आपल्या स्वरथा पोटी निधी देतो असे आश्वासन दिले अकोला पालकमंत्री व न.प.आकोट मधील संबंधित अधिकारी यांनी आकोट शहारातील गोरगरीब लोकांची दिशाभुल केली व कामे पुढे ढकल न्याचे काम केले व कामे एकत्रित करून लावण्याकरीता नगर परिषद आकोट चा जोर का बरं आम्ही याच्या अगोदर अनेकवेळा निवेदने दिली दलित वस्ती चे कामे चौकशी करून चालू करा व दलित वस्तीचा निधी सुवर्ण वस्तीत वळती होत आहे असे शासनाच्या निदर्शनास अनेक दा आणण्याचे प्रयत्न केले तरी पण अशेच चालू राहत असेल तर आम्हाला पुढे आंदोलन करण्याशिवाय आता पर्याय नाही आकोट मधील मंजुर कामास जबाबदार संबंधित अधिकारी असुन याची चौकशी करून यांच्यावर योग्य कारवाही करण्यात यावी जेणेकरून गोरगरीब व दलित वस्ती मधील कामात कोणी पुढे असे अधिकारी करतील नाहीत करीता आपल्या माहितीस निवेदन सादर आपण जर का असे नाही केले तर आम्ही आपल्या कार्यालय समोर तीव्र आंदोलन /मोर्चे/उपोषन करू काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असा इशारा लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांनी दिला सोबत नितीन तेलगोटे विक्की तेलगोटे नवनीत तेलगोटे प्रतीक तेलगोटे राजु भोंडे इम्रान पठाण दिपक तेलगोटे सुगत तेलगोटे विशाल पडघामोल रामेश्वर दाभाडे योगेश दवंडे नितीन पटेल दुर्गेश शिंगाडे असे अनेक लोकांच्या सह्या व नावे आहेत
Comments
Post a Comment