प्रधानमंत्री आवास योजनेचे आणुदान त्वरित द्या अन्यथा...तीव्र आंदोलनाचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा....
प्रधानमंत्री आवास योजनेचे आणुदान त्वरित द्या अन्यथा...
तीव्र आंदोलनाचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा....
हिंगोली नगरपरिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाचे अनुदान प्रलंबित असल्याने ...घरकुल धारकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
घरकुलाचे बांधकाम करायचे असल्याने व घरकुलाचे वर्क ऑर्डर नगर परिषदे मार्फत मिळाल्याने नागरिकांनी आपले राहते घर पाडून...राहण्यासाठी किरायच्या घराचा आधार घेतला...आणि आपले बांधकाम सुरू केले....परंतु नगर परिषदेमार्फत अनुदानाचा चेक मिळण्यास विलंब होत असल्याने घरकुल धारक अडचणीत सापडले आहेत...एकीकडे बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले असताना...किरायाच्या घरात राहणे आम्हाला कसे परवडणार असा सवाल घरकुल धारक करत आहेत
नगर परिषद प्रशासनाला विचारणा करायला गेले तर...अजून आम्हाला शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नाहीत अशी उत्तरे मिळत आहेत.
या बाबतीत आज दिनांक 09/05/2022 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर पालिका प्रशासनास निवेदन देऊन प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी लवकरात लवकर लाभार्थ्यांना द्यावा अशी मागणी करण्यात आली.
अन्यथा नगर परिषदेच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव रविंद्र भाऊ वाढे,जिल्हा सचिव ज्योतीपाल रणवीर,हिंगोली शहर अध्यक्ष शेख अतिखुर रहेमान,युवा जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे,हिंगोली विनोद नाईक तालुका अध्यक्ष प्रणव जोंधळे,बबन मामा भूक्तार, सुशील कसबे लखन खंदारे प्रल्हाद धाबे,भीमराव सुर्यातल आधी पदाधिकारी v कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment