घरकुल चे राहिलेले चेक लाभार्थी यांना तोरीत देऊन इतर मागण्या पुर्ण न केल्यास 16/6/2022 ला लाभार्थी सह नगर परिषद व उपविभागीय कार्यालय येथे मोर्च्याचा लखन इंगळे यांचा इशारा
*घरकुल चे राहिलेले चेक लाभार्थी यांना तोरीत देऊन इतर मागण्या पुर्ण करा नाहीतर 16/6/2022 ला लाभार्थी सह नगर परिषद व उपविभागीय कार्यालय येथे मोर्च्या लखन इंगळे यांचा इशारा*
आज दिनांक 7 जुन 2022 रोजी लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी साहेब आकोट
मुख्यअधिकारी नगर परिषद आकोट यांना काही मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले मागण्या अस्या होत्या
1)प्रधानमंत्री घरकुल योजनेचा मंजूर DPR 514,180,206,101,याचा निधी उपलब्ध करून लाभार्थी यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा
2)रमाई घरकुल चे लाभार्थी यांचे अर्ज 2011पासुन तर आज 2022 परियंत निधी अभावी रखडून पडले आहेत त्या करिता नवीन निधी मागवुन गरजु लोकांना घरकुलचा लाभ देण्यात यावा
3)गुंठेवारी धारक लाभार्थी यांचे अर्ज निकाली काढण्यात यावे कारण त्यांना घरकुल योजनेचा लाभ तोरीत घेता यावा
4)आकोट शहारातील निवासी अतिक्रमण धारक लाभार्थी यांच्या जागा कायम स्वरूपी पट्टे बहाल करण्यासाठी लाभार्थी यांनी दिलेल्या फायली /अर्ज नगर परिषद आकोट येथे पडून आहेत ते निकाली काढण्यात याव्या व काही वॉर्डाचे सर्वे अधुरे केलेले आहेत असे वॉर्डाचा सर्वे पुन्हा करण्यात यावा कारण अस्या लाभार्थी यांना घरकुल चा लाभ घेता येईल
5)आकोट शहारा मध्ये नागरी पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती काही ठिकाणी वाटर सप्लाय चे काम ठेकेदार कडून निकृष्ट दरज्याचे झाले असुन जसे राहुल नगर आकोट मध्ये झालेले वारंवार पाईपलाईन लिकीज होत आहे आहे असे अनेक ठिकाणी पाईपलाईन गाड झालेली आहे आपण याची चौकशी करून संबंधित ठेकेदार कडून काम पुन्हा करून घेण्यात यावे व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी
6)आकोट शहरातील प्रत्येक प्रभागातील मंजुर झालेले दलित वस्ती चे कामाचे टेंडर झालेले असुन दलित वस्तीतील कामाची पाहणी व चौकशी करूनच कामे चालू करण्यात यावे कारण अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजने मध्ये समाजकल्याण अधिकारी यांचा चुकीचा सर्वे झालेला आहे निधीचा गैर वापर होऊ नये
7)प्रधानमंत्री घरकुल/रमाई घरकुल योजनेचे राहिलेले गोरगरीब लाभार्थी यांचे चेक/निधी तोरीत लाभार्थी यांच्या खात्यात जमा करण्यात यावे
8)एपिएल राशेन कार्ड धारक विधवा,अपंग,वयोवृद्ध व इतर लाभार्थी यांना धान्य चालू करण्यात यावे
9)आकोट शहर व ग्रामीण भागातील रेशन दुकानमधील थंब मशीन मधून काही लाभार्थी यांचे पुरवठा विभागा द्वारे ऑनलाईन नावे वगळण्यात आली त्यामुळे गोरगरीब लोकांवर उपासमारी ची वेळ आली आहे करीता वगळण्यात आलेली लाभार्थी यांचे नावे यांना धान्य सुरु करण्यात यावे
10)श्रावणबाळ,दिव्यांग विधवा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी पासुन उत्पन्नाचा दाखला सादर करण्याचा आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन शासन निर्णय क्रं.विसयो.-2018/प्रक्र62/विसयो दि.20/08/2019 चा आदेश रद्द करण्यात यावा
11)आकोट शहारातील घाण कचरा व नाल्या ची संपूर्ण साफसफाई करण्यात यावी या मुळेलोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही कारण आता पावसाळा लागत आहे करीता नगर परिषद कडून संपूर्ण आकोट शहराची साफसफाई करण्यात यावी
करिता आपल्या सेवेशी निवेदन सादर वरील आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास आम्ही दि.16/6/2022 गुरुवार रोजी आपल्या कार्यालय येथे गोरगरीब लाभार्थी यांच्या सह मोर्च्या घेऊन येऊ काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असा इशारा लखन इंगळे यांनी दिला निवेदन देते वेळी सोबत सुरज दामोदर , सुनील इंगळे, नवनीत तेलगोटे , सुगत तेलगोटे , विलास तेलगोटे , प्रितेश रेखाते , नितीन तेलगोटे , जगदीश दातीर , रामेश्वर दाभाडे , रामदास तेलगोटे , राजु भोंडे , विशाल पडघामोल , सुगरीबाई राऊत , सूर्यकांता पटेल , योगेश दवंडे , दुर्गेश शिंगाडे , यांच्या सह अकोट शहरातील घरकुल धारक उपस्थित होते
Comments
Post a Comment