बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......
बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा 10 फेब्रुवारी पर्यंत समाप्त होत असून त्यामध्ये प्रामुख्याने कान्हेरी सरप , पिंजर, सिंदखेड मोरेश्वर, राजंदा, धाबा , महान या प्रामुख्याने जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 8 व 10 फेब्रुवारीला संपत असून या ठिकाणी शासन प्रशासक नेमण्याची शक्यता वाढली आहे.
बार्शिटाकळी तालुक्यामध्ये एकूण 84 ग्रामपंचायती असून त्यामध्ये प्रत्येक पाच वर्षात दोन टप्प्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असतात. यामध्ये 26 ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा संपत असल्यामुळे या ठिकाणी शासन स्तरावर प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत काम सुरळीत राहण्याकरिता प्रशासक नेमण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवण्यात येत आहे.
बार्शिटाकळी तालुक्यातील सुकळी , दोनद बुद्रुक , राहीत , वडगाव , मोरगाव काकड, हातोला , कातखेड , साहित , खेर्डा बुद्रुक , महान , रुस्तम्माबाद , झोडगा , कान्हेरी सरप , राजंदा, धाबा , वाघा वस्तापूर , महान , एरंडा , निहिदा , पुनोती बुद्रुक , सिंदखेड मोरेश्वर , पिंजर , कोथळी खुर्द , टीटवा , मांगूळ , जमकेश्वर या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल आठ तारखेला 14 ग्रामपंचायतचा कार्यकाळ तर बारा ग्रामपंचायतचा कार्यकाळ दहा फेब्रुवारीला संपत असल्याने आता ग्रामपंचायतचा गाव गाडा प्रशासक च्या हाती राहणार आहे. तर प्रत्येक गावामध्ये इच्छुकांची निवडणुकीच्या तारखेकडे लक्ष लागून राहिले आहे. सद्यस्थितीमध्ये असलेले पदाधिकारी ज्यांना त्यांनी केलेल्या कामाची पावती हे येणाऱ्या काही काळातच येत्या ग्रामपंचायत निवडणुकी मधून जनताच ठरवेल.
Comments
Post a Comment