श्री संत सेना प्रतिष्ठान तर्फे नाभिक समाजाच्या गुणवंताचा होणार गौरव..
श्री संत सेना प्रतिष्ठान तर्फे नभिक समाजाच्या गुणवंताचा होणार गौरव
अकोला प्रतिनिधी
श्री संत सेना प्रतिष्ठान खदान या संस्थेतर्फे अकोला जिल्ह्यातील नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोमवार दिनांक 11 जुलै रोजी घेण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी व बारावी या परीक्षा मध्ये 75 टक्के आणि त्याहून अधिक अधिक मास विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत 8 जुलै पर्यंत द्यावी . अनंतराव वाठुरकर, विवेकानंद वाठुरकर, हर्षद वाटुरकर , भास्कर वायकर, गणेश रुद्रकार, देविदास पिंजरकर लहान उमरी यांच्याकडे पाठवावे असे प्रतिष्ठानचे सचिव नंदूभाऊ बोपुलकर यांनी आवाहन केले आहे .
सहायता साहित्य प्राप्तीसाठी मागविले अर्ज
तसेच श्री संत सेना महाराज नाभिक समाज शैक्षणिक सहायता मंडळातर्फे अकोला तालुका व अकोला शहर येथील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्ग एक ते बारा पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मंडळाचे तयार केलेले सहायता साहित्य प्राप्तीसाठीचे अर्ज पाच जुलै पर्यंत जमा करावे असे आवाहन नाभिक समाज शैक्षणिक सहायता मंडळातर्फे करण्यात आले आहे
Comments
Post a Comment