गुलाम नबी आझाद महाविद्यालयात दिक्षांत समारंभ संपन्न
गुलाम नबी आझाद महाविद्यालयात दिक्षांत समारंभ संपन्न
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदवीदान ( दिक्षांत ) समारंभ नुकतेच डॉ पंजाबराव देशमुख सभागृह अमरावती येथे महाराष्ट्राचे राज्यपाल व कुलपती श्री भगतसिंग कोशारी व महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा नामदार श्री उदय सामंत व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे यांच्या उपस्थितीमधे संपन्न झाला. या पदवीदान समारंभात गुलाम नबी आजाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी चे एकुण ८ विद्यार्थी प्रथम मेरिटमध्ये आलेत तेव्हा त्यांना त्याठिकाणी पदवी बहाल करण्यात आली . तेव्हा उर्वरित विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आज दिनांक 16 जून गुरुवारला प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ मधुकरराव पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला. यावेळी मंचकावर प्राचार्य डॉ मधुकरराव पवार ,डॉ विनोद खारोडे ,प्राचार्य भाऊसाहेब लहाने महाविद्यालय पिंजर डॉ वाय पी सिंग,उप प्राचार्य डॉ आर आर राठोड उपप्राचार्य डॉ अमित वैराळे हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.दीपक चौरपगार यांनी विद्यार्थ्यांचे नावे वाचून डॉ विनोद खारोडे यांच्या हस्ते पदवी बहाल केली. तर मराठी विषयाचे डॉ वैशाली कोटंबे यांनी विद्यार्थ्यांची नावे वाचून प्राचार्य डॉ मधुकरराव पवार यांच्या हस्ते पदवी बहाल करण्यात आली. तशेच इंग्रजी विषयाचे डॉ प्रवीणकुमार राठोड यांनी नावे वाचुन तर विज्ञान शाखेचे प्रा बी.एल. गायकवाड यांनी तर वाणिज्य शाखेचे प्रा सुधीर राऊत यांनी आणि बी.व्होक शाखेचे प्रा संजय चव्हाण यांनी वाचन करून अध्यक्षांच्या हस्ते पदवी वितरण करण्यात आली. या पदवी समारंभ कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि त्यांचा उत्साह पाहता नवचैतन्यमय वातावरण निर्माण झाले तशेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी आणि आपल्या महाविद्यालयाचे नाव रोशन करावं महाविद्यालयाचे कर्मचारी मनोहर खाडे यांचा मुलगा अनिकेत खाडे याने पदवीत्तर समाजशास्त्र विषयात प्राविण्य प्राप्त केलं असा आदर्श प्रत्येकाने घ्यावा असे विविध उदाहरणे देत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मधुकरराव पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ मधुकरराव पवार यांनी एक छोटेसे रोपटे येथे महाविद्यालयाच्या रुपात लावलं आणि आज ते वटवृक्षा मध्ये रुपांतरीत झाल्याचं सांगत आठ विषयांमध्ये पी.जी. असलेलं आणि नँक द्वारा A दर्जा प्राप्त असलेलं हे ग्रामीण भागातील एकमेव महाविद्यालय आहे या महाविद्यालयाचे असे विद्यार्थी तसेच त्यांना घडविणारे प्राध्यापक हेही तेवढेच अभिनंदनास पात्र आहेत असे मत डॉ विनोद खारोडे यांनी व्यक्त केले. डॉ वाय पी सिंग यांचेही यावेळी भाषण झाले. या कार्यक्रमाची मोठी जबाबदारी श्री रवींद्र भटकर, श्री रुइदास आडे यांनी पार पाडली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ विनोद उंडाळ तर सुधीर राऊत यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला डॉ वैशाली कोटंबे , अधिक्षक नंदकुमार राऊत , मुख्य लिपिक शांताराम जाधव, मुफीज खान,दत्ता शास्त्री, पंजाब जाधव , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पदव्युत्तर समाजशास्त्र चा विद्यार्थी अक्षय खंडारे तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट चे प्रथम मेरीट आलेले विद्यार्थी आकाशसिंग दिपसिंग बाजहिरे, भूषण ओंकार खराटे, निळकंठ संजय तिवारी व नेटवर्किंग सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये प्रथम मेरीट आलेले विद्यार्थी कुणाल दिलीप चव्हाण, गौरी दयाराम राऊत, धनश्री केशव राऊत, सय्यद सक लैन अख्तर या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. त्याबद्दल संपूर्ण बार्शीटाकळी तालुक्यातुन त्यांचे कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment