स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांची कारवाई;अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई, एक देशी कट्टा मॅगझिनसह जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांची कारवाई;
अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई, एक देशी कट्टा मॅगझिनसह जप्त
आज दिनांक २०/६/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि गोपाल जाधव व त्यांचे तपास पथकातील कर्मचारी यांना गोपनिय माहिती मिळाली की पो. स्टेशन बार्शिटाकळी हद्दीतील खडकपुरा येथील राहणारा शेख वसीम उर्फ कचौडी शेख नवाब वय २५ हा लोकांमध्ये दहशत पसरविण्याचे उद्देशाने त्याचे जवळ अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून आहे. अशा खात्रीलायक माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि गोपाल जाधव यांनी पोलीस स्टाप व पंचासह जुने बस स्थानक ता बार्शिटाकळी जिल्हा अकोला येथे सापळा रचून एक देशी कट्टा व मॅगझीन किंमत १२००० ₹ मिळुन आल्याने आरोपी याचे जवळुन जप्त करण्यात आला असून त्याचे विरूद्ध पो. स्टेशन बार्शिटाकळी येथे अप. क्र. ३१८/ २२ कलम ३ , २५ आर्म ऑक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक साहेब जी श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक मॅडम श्रीमती मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष महल्ले स्थानिक गुन्हे शाखा अकोला, पोउपनि गोपाल जाधव, पोलीस हवालदार , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ बोरकर, नितीन ठाकरे, नापोकॉ गोकुळ चव्हाण, पो. कॉ. लिलाधर खंडारे, स्वन्पिल खेडकर, चालक नापोकॉ अक्षय बोबडे यांनी कार्यवाही केली
Comments
Post a Comment