बार्शीटाकळी शहरवासीयांना स्वच्छ , सुरक्षीत पिण्याचे पाणी देण्याकरिता डॉक्टर वेलक्युअर असोसिएशन तर्फे नगराध्यक्षांना निवेदन

*बार्शीटाकळी शहरवासीयांना स्वच्छ , सुरक्षीत पिण्याचे पाणी लवकर मिळून देणे डॉक्टर वेलक्युअर असोसिएशन तर्फे नगराध्यक्षांना निवेदन* 

बार्शीटाकळी (तालुका प्रतिनिधी)22 जून 

बार्शीटाकळी डॉक्टर वेलक्युअर असोसिएशन तर्फे नगराध्यक्ष नगरपंचायत बार्शीटाकळी यांना निवेदन देण्यात आले यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा हा अधिकार आहे की त्याला सुरक्षीत व स्वच्छ पिण्याचे पाणी वैयक्तिक आणि घरगुती वापरासाठी मिळावे . मात्र कित्येक वर्षापासून बार्शीटाकळीवासी आपले हक्काचे पाणी मिळण्यापासून वंचीत आहेत . बार्शीटाकळी शहरातील पाणी पुरवठा योजनेकरीता शासनाने नगर पंचायतला २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे वर्तमानपत्रातून वाचण्यात आले आहे . बार्शीटाकळीत पाणीटंचाई आहे जे पाणी शहरातील लोकांना मिळते ते मोठ्या प्रमाणात दुषित पाणी असून बार्शीटाकळी शहरामध्ये अतिसार ( Diarrhoea ) , आमांश ( Dysentery ) , विषमज्वर ( Typhoid ) इत्यादी आजार मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत , त्यामुळे सार्वजनिक स्वास्थ्याला धोका निर्माण झाला आहे . तरी बार्शीटाकळी शहरातील नागरीकांना स्वच्छ , शुध्द पाण्याअभावी होणाऱ्या आरोग्याच्या हानीकडे जबाबदारीने लक्ष देऊन बार्शीटाकळीवासियांना पिण्याचे स्वच्छ पाणी शहरात पाणी पुरवठा योजनेचे कार्यान्वयन करुन मिळवून द्यावे असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी डॉक्टर वेलक्युअर असोसिएशन चे सदस्य खलील परमाने उपस्थित होते डॉ. मुदस्सीर खान, डॉ. माजिद अली, डॉ. गुफरान ,डॉ. शोएब खान ,डॉ मोहम्मद मुजाहिद ,डॉ. खालिद ,डॉ नासिर ,डॉ तनवीर जमाल,डॉ. गजानन हटेले,, डॉ. सलमान खान,डॉ. वसील शेख, डॉ तजीम खान ,आदी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे