शाफिक राही यांची उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार

शाफिक राही यांची उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार 


बार्शीटाकळी प्रतिनिधी

अकोला जिल्हा परिषद च्या वतीने नुकताच पदोन्नती प्रक्रिया पार पडली असून यामध्ये अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ शिक्षकांना विस्ताराधिकारी उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नती देण्यात आली आहे त्यामध्ये जग प्रसिद्ध कवी डॉक्टर मेहबूब राही यांचा मुलगा अकोला जिल्हा परिषद मध्ये विषय शिक्षक या पदावर कार्यरत असलेले शफीक अहमद खान राही यांची महान जिल्हा परिषद शाळेवर उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नती देण्यात आली आहे त्याबद्दल बार्शी टाकळी येथील उर्दू शिक्षक संघटना कडून त्यांचे निवासस्थानी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या वेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद उर्दू शाळा इंद्रा नगर येथील मुख्याध्यापक काजी रिजवानउद्दीन हे होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून खालीद बिन वालिद शिक्षण व कल्याणकारी संस्था ची उपाध्यक्ष डॉ शाहिद इक्बाल खा जिल्हा परिषद शाळा, बिहाड माता महानचे मुख्याध्यापक सैफुद्दीन जिल्हा परिषद उर्दू शाळा 21 महेल महानचे मुख्याध्यापक राहुल्लह खान , इमरान अली , गुलाम अली उर्फ किंग खान , सखाउल्ला खान समिउल्ला खान
शब्बीर अहेमद खान , वकार खान , असजल अकमल खान , यांची प्रमुख उपस्थिती होती या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाहिद एकबाल खान यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू माध्यमाचे शिक्षक उपस्थित होते तसेच यावेळी दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले असजल अकमल खान यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे