बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शिटाकळी ने यशाची प्रथा ठेवली कायम

बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शिटाकळी ने यशाची प्रथा ठेवली कायम.
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 

       स्थानिक बाबासाहेब धाबेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाला मध्ये दर वर्षी प्रमाणे यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली अहे,
राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी चा निकाल आज जाहीर झाला असून कनिष्ठ महाविद्यालयात ९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यात विज्ञान शाखेचे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच मराठी कला शाखेचे १०० टक्के तर उर्दू कलाचा निकाल ९९ टक्के लागला त्यात विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक सोबिया अहजाम काजी निसारउद्दीन , या विद्यार्थिनी ८६.३०% टक्के गुण प्राप्त केले तसेच नगरसेवक बबलु काजी यांचा मुलगा  काजी अशरोद्दीन बबलू काजी याने ८५.८३ टक्के गुण प्राप्त करून व्दितीय क्रमांक आला, तर तृतीय क्रमांक अमिमा तसनिम अब्दुल मोहसीन ८५.५० टक्के गुण प्राप्त केले तसेच मराठी कला शाखेतून प्रथम क्रमांक निलखन किरण परशुराम यांनी ७८.१६ टक्के द्वितीय क्रमांक सावळे पल्लवी किशोर याने ६९.६६ टक्के तर तृतीय क्रमांक राठोड शालिनी अविनाश यांनी ६८.८३ टक्के गुण प्राप्त केले तसेच उर्दू कला मधून प्रथम क्रमांक हुजैफा परवीन मोहम्मद जमील या विद्यार्थ्यांनी ७५ टक्के गुण प्राप्त करून बाजी मारली द्वितीय क्रमांक अस्फा फतेमा मोहम्मद साबिर यांनी ७४.५० टक्के गुण प्राप्त केले तर तृतीय क्रमांक जवेरिया मेहविश सय्यद जमीर आणि शाईफा असरा अब्दुल एजाज हे दोघेही विद्यार्थिनी ७३.६६ टक्के गुण प्राप्त करुन यश पटकावले.
बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय याने दरवर्षीप्रमाणे आपली यशाची प्रथा कायम ठेवली उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय वडिलांना व कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य गजेंद्र श्रीराम काळे सर ,तसेच वर्ग शिक्षकांना दिले 
-------------------------------------------------------------------
सावित्रीबाई फु. वि. व ज्योतिबा फु. कनिष्ठ महाविद्यालयाचाही १००%निकाल लागला

नुकतेच जाहीर झालेल्या बारावीच्या निकाल मध्ये स्थानीय सावित्रीबाई फुले विद्यालय ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय बार्शिटाकळी चा निकाल शंभर टक्के लागला परीक्षेत एकूण ७१ विद्यार्थी बसले होते त्यापैकी प्रथम श्रेणीत २५ व उर्वरित द्वितीय श्रेणीत आले संस्थेचे सचिव आदरणीय श्री. सतीश मखरामजी पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व प्राचार्य मॅडम, प्राध्यापक ,प्राध्यापिका यांचे अभिनंदन केले 
-------------------------------------------------------------------
गुलाम नबी आझाद कनिष्ठ महाविद्यालय बार्शिटाकळी चा वर्ग १२ वी चा निकाल ९५ टक्के लागला 

       स्थानिक गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चा १२वी चा निकाल लागला असून
               १२ विज्ञान -- ४७ पैकी ४५ उत्तीर्ण , ९५.७४ टक्के , १२ कला --३८ पैकी २९ उत्तीर्ण , ७६.३८ टक्के ,, १२ वाणिज्य १६ पैकी १४ उत्तीर्ण ८७.५० टक्के . एच.एस.व्ही सी. ५१ पैकी ४८ उत्तीर्ण ९४.११ टक्के . निकाल लागला. यापैकी १३ विद्यार्थ्यी प्राविण्यामध्ये , प्रथम श्रेणी २३ , द्वितिय श्रेणी ९० , पास श्रेणी १० असे एकुण १३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षक वृंदाचे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ मधुकरराव पवार यांनी अभिनंदन केले 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे