झाडे लावा,पर्यावरण वाचवा, ऑक्सिजन वाढवा. शब्बीर शहीद
झाडे लावा,पर्यावरण वाचवा, ऑक्सिजन वाढवा.
शब्बीर शहीद....
बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी.
स्थानिक मिनारा मस्जिद चौक अकोली बेस येथे पर्यावरण दिनी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक शब्बीर शाहिद यांनी गावातील शाळे करी मुलांना सोबत घेऊन परिसरात झाडे लावण्यात आले.तसेच पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी झाडे लावा व झाडे जगवा या बद्दल होणारे फायदे व याचे महतत्व या ची सखोल माहिती देण्यात आली.
या वेळी शब्बीर शाहिद यांनी १०१ झाडांची भेट शाळे मुलांना देऊन ते आपापल्या परिसरात लाऊन त्यांना जगवण्या विषयी सुद्धा माहिती दिली.प्रमुख अतिथी म्हणून मोहम्मद नासिरोड्डीन नासीर,मोहम्मद सादिक, रौशन आली शाह आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नगर सेवक श्रावण भातखडे यांनी केले. कार्यक्रमात शाडेकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment