ग्रामीण भागात एस टी बसेस सुरू करण्यात याव्यात - मनसेचे निवेदन
ग्रामीण भागात एस टी बसेस सुरू करण्यात याव्यात - मनसेचे निवेदन
बार्शीटाकळी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका बार्शीटाकळी कडून ग्रामीण भागातही बस चालू करण्याकरता अकोला विभाग नियंत्रक यांना निवेदन दिल्या गेले असून संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या आदेशाने आणि जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष सचिन पाटील गालट यांनी अकोला विभागिय नियंत्रक रा. प. म.यांना निवेदन सादर केले असून निवेदनानुसार बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा मार्गे जाणाऱ्या अकोला ते धानोरा तसेच अकोला ते चिखलगाव आणि अकोला ते मालेगाव ह्या तीन बसेस त्वरित चालू करण्यात याव्या ही विनंती केली असून शाळकरी , महाविद्यालयीन विद्यार्थी , रोजगारासाठी रोज ये जा करणारे आणि रूग्न यांचे हाल होत असून त्यासाठी बसेस लवकर सुरू करण्यात यावा असा निवेदनात उल्लेख केला असून लवकर बसेस सुरु होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे .
सदर निवेदन देते वेळी गजानन काळे , कल्पनाताई राठोड , उमेश कोकाटे , शिवप्रताप मेघाडे , रामेश्वर नानोटे , गणेश थोरात , बाळकृष्ण उताने पाटिल , संदीप गोपणारायन , वैभव जानोरकार, योगेश शिंदे , वैभव कोहर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment