बार्शिटाकळी येथे बकर ईद (ईद उल अजहा) मोठ्या उत्साहाने साजरी
बार्शिटाकळी येथे बकर ईद (ईद उल अजहा) मोठ्या उत्साहाने साजरी.
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
बार्शिटाकळी शहरा मध्ये आज बकरी ईद (ईद उल अज हा) मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
काल सायंकाळ पासून आभाळ चे वातावरण होते व सकाळी पाऊस पण सुरू झाला होता परंतु ईद च्या नमाज पठण च्या वेळेस पाऊसा ने विश्रांती दिली व ईद गाह वर जामा मस्जिद चे इमाम व खतीब मौलाना अजीज उल्लाह खान यांनी नमाज अदा केली.
पाऊसाचे वातावरण असल्याने अधिक तर लोकांनी मस्जिद मध्ये ईद ची नमाज पठण केले. मिनारा मस्जिद आकोली बेस येथे जमिअत ए उलमा चे तालुका अध्यक्ष व इमाम व खतीब मौलाना अब्दुल सलाम यांनी तर मस्जिद अक्सा खडक पुरा येथे मौलाना एजाज यांनी नमाज पठण केले तसेच मस्जिद रहमत इंद्रा नगर येथे मौलाना सईद बेग यांनी तर मस्जिद अबुबकर हालोपुरा येथे हाफीज खालिद उर रहेमान यांनी,मस्जिद दहेंड बेस येथे अब्दुल समद इमाम यांनी,मस्जिद गुलजारी अहमदीं बाजार लाईन येथे मास्टर इरफानोद्दिन यांनी,मस्जिद खिडकी पुरा येथे काझी नझिमोद्दिन यांनी यांनी व मस्जिद दरुस सलाम ग्रीन कॉलनी येथे मुफ्ती साद खान यांनी ईद उल अजहा च्या नमाज चे पठण केले.
ईद ची नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी ईद च्या शुभेच्छा दिल्या तसेच येथील हिंदू बांधवांनी सुध्दा मुस्लिम बांधवांनी ईद ची शुभेच्छा दिली. स्थानिक पोलिस स्टेशन चे ठाणेदार संजय सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवन्यात आला होता या साठी खूप्या विभागाचे पोलिस किशोर पिंजरकर, पोलीस उप निरक्षक पदमने , टाऊन चे नागसेन वानखेडे आदींनी खुप परिश्रम घेतले होते.
Comments
Post a Comment