*कानडी येथील गावठी दारू अड्ड्यावर पिंजर पोलिसांचा छापा*
*कानडी येथील गावठी दारू अड्ड्यावर पिंजर पोलिसांचा छापा*
बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी.
बार्शी टाकळी तालुक्यांतील पिंजर पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम कानडी बाजार येथील गावठी हातभट्टी दारूअड्ड्यावर,पिंजर पोलिसांनी छापा मारला असता तेथून आरोपी पळून गेले, पोलिसांनी,३३ हजार ४००रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दारू साहित्याची तोडफोड केली,गावठी हातभट्टी दारू उध्वस्त केली,कानडी बाजार येथील एका राहत्या घरात गावठी दारू गाळणे आणि त्याची विक्री होत असल्याची माहिती पिंजर पोलिसांनी मिळताच ठाणेदार अजयकुमार वाढवे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय बंन्डू मेश्राम कानडी बीटचे इन्चार्ज राजु वानखडे अशोक देशमुख अभिजित शिरसाट, होमगार्ड शरद पवार दिनेश सावळे नजिर हुसेन मनिष सातरोटे निखील चांदुरकर अयाज खान यांनी जाग्यावरच २० डब्बे फोडफाड केले, गावठी दारू ३४ लिटर आणि मोहमाच ३०० लिटर व इतर साहित्य असा एकूण ३३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाले,या कारवाही मुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
Comments
Post a Comment