आगामी बकरी ईद या सणाच्या अनुषंगाने बार्शिटाकळी पोलीसांचे शहरात पथसंचलन
आगामी बकरी ईद या सणाच्या अनुषंगाने बार्शिटाकळी पोलीसांचे शहरात पथसंचलन
बार्शिटाकळी प्रतिनिधी
आज दिनांक 9/7/20220रोजी
आगामी बकरी ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दंगली, रास्तारोको अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी पोलीस यंत्रणेसह ईतर आपत्कालीन यंत्रणा वेळेत हजर होण्यास विलंब होणार नाही याची दक्षता व काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अकोली वेस मज्जीद चौक ,जामा मज्जीद चौका,समोर प्रात्यक्षिक करण्यात आले यावेळी बार्शिटाकळीचे पोलीस निरीक्षक श्री संजय सोळंके साहेब यांनी प्रात्यक्षिकाव्दारे तत्परतेचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. पथसंचलना मध्ये उपनिरीक्षक निलेश तारक यांच्या सह
20 पोलीस अधीकारी,महीला पोलीस, खुपिया विभाग प्रमुख किशोर पिंजरकर, असा लवाजमा दिनांक 09 जुलै संध्याकाळी 5:00 वाजता सुमारास पोलीस स्टेशन मधुन डोक्यावर हेल्मेट,हातात लाठी, संरक्षण जाळी, आदि साहीत्य घेऊन अकोली वेस चौक,जामा मज्जीद चौक,गजरी लाईन, नगरपंचायत चौक मार्गे पोलीस स्टेशन ला पथसंचलन करण्यात आले
Comments
Post a Comment