प्रती पंढरपूर ओळखल्या जाणाऱ्या पिंजर येथे आषाढी पोर्णिमेनिमित्त भव्य यात्रा , महाप्रसाद व दहीहंडी
प्रती पंढरपूर ओळखल्या जाणाऱ्या पिंजर येथे आषाढी पोर्णिमेनिमित्त भव्य यात्रा , महाप्रसाद व दहीहंडी
बार्शीटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल )
आषाढी पौर्णिमेच्या दिवसापासून विठ्ठल- रूख्मिणीचा अडीच दिवस मुक्काम पिंजरला राहतो, असे येथील अध्यत्म आहे , त्यामुळे पिंजरच्या विठ्ठल रुख्मिणीचे सतत तीन वेळा दर्शन घेतल्यानंतर एका वेळेस पंढरपरचे दर्शन घडते, असा येथील एक इतिहास आहे, त्यामुळे पिंजरला महात्म्य प्राप्त झाले आहे आणि सर्व वयोवृद्ध मंडळी पिंजरला प्रति पंढरपूर म्हणून ओळखतात. आषाढी पोर्णिमे निमित्त येथे गुरुवारी व शुक्रवारी अशी दोन दिवस भव्य यात्रा भरणार असून दहीहंडी व महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.
गेली दोन वर्षे कोरोना असल्यामुळे येथील यात्रा भरली नव्हती. गेल्या दोन वर्षांपासून जिर्णोद्धाराचे काम सुरू होते ते आता पूर्ण झाले आहे. जीर्णोद्धार झाला असल्याने मंदिर परिसरात नवं चैतन्य निर्माण झाले आहे . आषाढ पौर्णिमा ची यात्रा बुधवार 13 जून पासून सुरू होईल. सायंकाळी 5:30 वाजता पहिली दहीहंडी फोडल्या जाईल तर दुसरी दहीहंडी गुरुवारी 6:30 वा आणि गुरुवारीच दुपारपासून महाप्रसादाचे वाटप सुरू होईल. यात्रेनिमित्त सर्व दुकानदार आणि दुरदूरवरून भाविक येथे येत असतात. पिंजरचे मोठे महात्म्य असल्याने पिंजरला प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाते त्यामुळे भव्य यात्रा सुद्धा भरते. चिखली तालुका मंगरुळपीर येथील संत झोलेबाबा यांच्या दिंडी सह असंख्य दिंड्या, पालख्या येतात, आलेल्या भाविकांची मंदिराचे वतीने जेवण व झोपण्याची व्यवस्था केल्या जाते. पिंजरच्या यात्रेला खूप दूरवरून भाविक वर्ग येत असतो, हा सर्व सोहळा आनंदात पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष श्रीपाद पापडकर यांचेसह सर्व पदाधिकारी व भाविक मंडळी परिश्रम घेत आहेत . यावेळी पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात असतो , या वर्षी ही ठाणेदार अजयकुमार वाढवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे .
Comments
Post a Comment