बार्शीटाकळी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक आठ व नऊ मधील रस्ते व नाली बांधण्याची नागरिकांची मागणी
*बार्शीटाकळी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक आठ व नऊ मधील रस्ते व नाली बांधण्याची मागणी*
बार्शिटाकळी प्रतिनिधी
बार्शीटाकळी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक आठ व नऊ मधील रस्ते व नाल्या गेल्या 20 वर्षापासून बांधण्यात आले नाही त्यामुळे या भागातील नागरिकाना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे सध्या पावसाळा सुरू असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करून पाऊलवाट काढावी लागत आहे तसेच घाण , चिखल, यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे संबंधित नगरपंचायत प्रशासनाने तेवरीत दखल घेऊन नागरिकांची समस्या सोडवून या भागात रस्ते व नाली बांधकाम करण्याची मागणी बाबत चे निवेदन बार्शीटाकळी येथील प्रभाग क्रमांक आठ व नऊ माधील रहवासी नागरिक यांनी बार्शीटाकळी चे मुख्याधिकारी व बार्शीटाकळी नगरपंचायत चे नगराध्यक्ष यांना निवेदन देऊन सदर काम त्वरित करण्याची मागणी केली आहे सदर काम त्वरित न केल्यास पंधरा दिवसानंतर नगरपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याची चेतावणी सुद्धा निवेदना मध्ये देण्यात आली आहे बार्शीटाकळी नगरपंचायत च्या कुचकामी धोरणामुळे सध्या संपूर्ण बार्शीटाकळी शहरात नागरिकांचे हाल होत आहे पावसाळ्यात नागरिकांना विविध मूलभूत सुविधांसाठी वनवन भटकावे लागत आहे सदर देण्यात आलेल्या निवेदनावर मो हुसेन मो कासीम, शेख रहीम शेख जमीर ,सय्यद आखतर अली, सय्यद अकबर अली ,अ वहिद, अ नफिज ,अ राउफ , आणि इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्याचे निवेदन देण्यात आले
Comments
Post a Comment