मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा. जिल्हा व सत्र न्यायालयचा निकाल

मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयचा निकाल
अकोला प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी.पिंपळकर यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल शनिवारी देण्यात आला.
बार्शीटाकळी पो. स्टे. येथे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपी उल्हास पुंजाजी चव्हाण याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) श्री V D पिंपळकर साहेब यांच्या न्यायालयात भा. द. वी. कलम ३७६(२)(j) मध्ये आजन्म कारावास, रू ५००००/- दंड, दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त शिक्षा व पॉक्सो कायदा कलम ३ (A) ४ मध्ये दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा रू ५०,०००/- दंड, दांड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने शिक्षा व पीडिता व कुटुंबीयांना धमक्या दिल्या बद्दल भा. द. वी. कलम ५०६ मध्ये ७ वर्षे शिक्षा रू १००००/- दांड, दांड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली विविध कलमा मध्ये एकूण रू १,१०,०००/- दंड ठोठावण्यात आला, सर्व शिक्षा एकत्रित भोगाव्या लागणार आहेत. दि ६/०४/२०१४ रोजी पीडितेच्या काकुने फिर्याद दिली की पीडिता ही शेतामधील विहिरीवर पाणी आणावयास गेली असता ती परत आली नाही म्हणून शोध घेतला असता बाजूच्या नाल्यातून आवाज आल्याने बघितले असता तिथे आरोपी तिच्यावर जबरदस्ती करीत असताना तिने व इतर महिलांनी  पाहिले, नंतर आरोपी पळून गेला अशी फिर्याद नोंदवण्यात आली,  त्या नुसार साक्ष पुरव्या वरून गुन्हा सिद्ध झाल्याने वरील प्रमाणे न्यायनिवाडा करण्यात आला. सरकार तर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले होते. पी. एस. आय. कडेखन पठाण यांनी  पो नी देवराव खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास केला होता, सरकार तर्फे सहायक सरकारी अभियोक्ता किरण खोत यांनी बाजू मांडली. एच. सी. पिंजरकर व सी एम एस चे ASI प्रवीण पाटील यांनी पैरवी म्हणून काम पाहिले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे