भारत सरकारने " अशोक स्तंभ" या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान केल्याबद्दल त्यांचा वंचित बहुजन आघाडी तालुका बार्शिटाकळीच्या वतीने जाहीर निषेध

भारत सरकारने " अशोक स्तंभ" या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान केल्याबद्दल त्यांचा वंचित बहुजन आघाडी तालुका बार्शिटाकळीच्या वतीने जाहीर निषेध
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
आज दिनांक 19/7/2022 रोजी वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने तहसीलदार श्री गजानन हामद यांना भारत सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
26 जानेवारी 1950 साली भारत सरकारने सम्राट अशोक यांनी सारनाथ येथे उभारलेल्या स्तंभावरील " सिंह शीर्ष" हे स्वतंत्र भारताची " राष्ट्रीय मुद्रा " म्हणून स्वीकारले होते.
मुळात हे शिल्प आणि त्यांच्या खाली असलेले हत्ती, बैल, दौडणारा घोडा आणि सिंह यांची कोरीव शिल्प हे भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग अधोरेखित करते. मानवतावादी, संपुर्ण प्राणी मात्रा विषयी करूणा व मंगल कामना असलेला बुद्ध विचार म्हणजेच धम्म याचे प्रतीक हा सिंह आहे.  तो शांत आहे स्वतंत्र आहे त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आहे व डोळ्यात धुऊन निश्चय त्याचा जवळ नैसर्गिकरीत्या उघडलेला आहे शिल्पकारांना तसेच तन्मयतेने संपूर्ण बुद्ध विचाराचे भाव या संपूर्ण शिल्पात कोरलेले पाहायला मिळतात हे मानवतावादी विचार चारही दिशांना पसरावे म्हणून हे चार सिंह पाठीला पाठ लावून चार दिवसाकडे तोंड करून आहेत सम्राट अशोक यांना हे अभिप्रेत होते म्हणून त्यांनी हा स्तंभ व हे शिल्प उभारले उभारले हेच मानवतावादी सर्वप्रती स्वतंत्र्य, समता आणि बंधू भावाचा विचार, स्वतंत्र झालेल्या भारतातील भारताला सर्व जगात घोषित करायचे होते म्हणूनच भारताच्या प्रथम मंत्रिमंडळाने एक मताने शिल्प राष्ट्रीय मुद्रा म्हणून स्वीकार केले नुकतेच प्रधानमंत्री यांनी नवीन बांधलेल्या संसदेवर ठेवण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय शिल्पाचे उद्घाटन केले मात्र या नवीन शिल्पातील शांत भाव उघडून चारही सिंहाचे भाव अतिशय हिस्त्र दाखवले आहेत त्यामुळे मूळ शिल्पाचा आणि त्यात असलेल्या बोधाचा अपमान झाला आहे . सिंहाच्या मूळ शिल्पात बदल करून नव्या शिल्पातील हिस्त्रपणा हा संघाचा विश्वास असलेल्या हिंसावादी व विदेशी राष्ट्रवादी राष्ट्र चिन्हात बदल घडवून आणण्याचे हे गंभीर षडयंत्र आहे असे शिल्प मान्य करण्याचा निर्णय हा भारताच्या निर्मात्यांनी व सर्व भाव प्रजासत्ताक भारताने स्वीकारलेल्या स्वतंत्र्य, समता , न्याय व बंधुत्वाच्या मूल्यांचा अपमान केला आहे. या नवीन हिंस्त्र शिल्पाचा (राष्ट्रीय मुर्देचा नव्हे) आणि ह्या शिल्पाची संकल्पना बलण्याचा निर्णय घेणा-या सरकार चा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करत आहे. अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले यावेळी दादाराव सुरडकर प्र ता अध्यक्ष, जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, रामदास घाडगे प. स. गटनेते, रोहिदास राठोड प.स.सदस्य, दादाराव पवार प.स.सदस्य, अमोल जामनिक तालुकाध्यक्ष युवक आघाडी, गोबा शेठ, सुरेश जामनिक उपाध्यक्ष न.प., सुनील विठ्ठलराव सिरसाठ आरोग्य सभापती तथा गटनेते न.प., श्रावण रामदास भातखडे नगरसेवक, समाज सेवक अनीलभाऊ धुरंधर, समाज सेवक सै अबरार, दिनेश मानकर, गणेश म्हसने, कृष्णा देवकुणबी, मिलींद करवते, गोरशिंग राठोड, हरिश रामचवरे, सुबोध गवई, भुषण सरकटे, शेख सलीम महान, अनिल चव्हाण, नितेश खंडारे, गजानन जाधव, अतुल सिरसाठ, साहिल यशवंतराव गवई, रक्षक जाधव, निलेश ईगळे, राजेश खंडारे, व तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे