बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे शिवभक्त कावड मंडळाची आढावा बैठक सपन्न.... श्रावण मास शांततेत पार पाडण्याचे ठाणेदार संजय सोंळके यांचे आवाहन.....
बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे शिवभक्त कावड मंडळाची आढावा बैठक सपन्न
श्रावण मास शांततेत पार पाडण्याचे ठाणेदार संजय सोंळके यांचे आवाहन
प्रतिनीधी , बार्शिटाकळी ,
सद्या श्रावण मास सुरु होणार त्यावेळी शिवभक्त विविध ठीकानाहुन कावड द्वारे पवित्र जल आणून शहरात मिरवणूक काढत जलाभिषेक करतात त्या मिरवणूक वेळी कायदा सुव्यवस्था अबाधीत राहीली पाईजे त्यासाठी पोलीस स्टेशन द्वारे प.समीती सभागृहात कावड धारी अघ्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य समवेत आढावा बैठक घेण्य़ात आली ,
सदर बैठकीचे मार्गदर्शक बाशिटाकळी पोलीस स्टेशन . चे ठाणेदार संजय सोंळके होते , सदर बैठक चे अध्यक्ष स्थानिक न.प.चे मुख्याधीकारी शिवहरी थोंबे होते , प्रमुख अतिथी म्हणून रमेश वाटमारे , श्रीराम येळवनकार , गजानन मानतकर , प.स.रोहिदास राठोड , मंचावर उपस्थित होते , कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रर्दशन गोपनीय पोलीस विभागचे किशोर पिजंरकर यांनी केले , कार्यक्रमाचे सुत्र संचालन अनंत केदारे नेकेले , शिव भक्त कावडघारी ने मिरवणूक वेळी डी जे च्या वापर व बॅन्ड 'बाजाचा वापर करू नका . आणी लाब झडा गोल फिरवू नका धार्मीक स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नका , शांतता मार्गाने मिरवणूक पार पाडा , मिरवणूक वेळी कायद्याचे पालन करुन पोलिस विभागाले सहकार्य करा ठाणेदार संजय सोळके यांनी कावड धारी शिव भक्ता ना सुचना दिल्या , त्या वेळी रमेश वाटमारे यांनी सुद्धा आपले योग्य विचार माडले , कावड द्यारी याच्या अमान्य मागण्या ठाणेदार यांनी फेटाळून लावल्या , शेवटी शांतता ने बैठक पार पडली , त्यावेळी ऑड विनोद राठोड , महिला दक्षता समीती सदस्य सौ , पुष्पाताई रत्नपारखी , विनायक टेकाडे , गजानन वाटमारे , गोपाल वाटमारे , दत्तात्रय साबडे , विलांस कापकर इतर शिव भक्त कावड मंडळाचे अघ्यक्ष व उपाध्यक्ष आणी सदस्य मोठया संख्येने उपस्थीत होते ,
छाया , शिवभक्त कावड . मंडळीले मान्यवर मागॅदर्शन करताना,
Comments
Post a Comment