शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांसाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना सरसावली.... एकाच दिवशी सहा अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याची करण्यात आली मागणी....

*शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांसाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना सरसावली*
*एकाच दिवशी सहा अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याची करण्यात आली मागणी*
प्रतिनिधी बार्शिटाकळी 
 अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाच्या वतीने मंगळवारी शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत अकोला चे जिल्हाधिकारी अकोला जी प चे अध्येक्षा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक मुख्यालेखा वित्त अधिकारी
शिक्षण सभापती जी प अकोला यांना निवेदन देऊन सदर समस्या त्वरीत सोडविण्या बाबत विनंती करण्यात आली यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाचे अकोला जिल्हा अध्यक्ष अनीसोद्दिन कुतबोद्दिन , जिल्हा कार्याध्यक्ष शाहिद इक्बाल खान सरफराज खान, जिल्हा सचिव रईस अहेमद निसार अहेमद , प्रसिध्दी प्रमुख मो अश्फाक , मुख्याध्यापक राहुल्लह खान सरफराज खान,  आदी जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी निवासी उप जिल्हा अधिकारी डॉ प्रा संजय खडसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुभाष पवार शिक्षण अधिकारी प्राथमिक डॉ वैशाली ताई ठग मुख्यालेखा वित्त अधिकारी विद्या  पवार यांच्याशी शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांवर चर्चा करून सदर समस्या निकाली काढण्याबाबत मागणी करण्यात आली या मध्ये  १२ वर्ष व २४ वर्ष झालेले शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी  निवड वेतन श्रेणी लागू करण्यात यावे तसेच जि.प.शाळांचे इलेक्ट्रीक बिल जि.प. सेस फंडातुन शाळांचे सादिल खात्यामध्ये जमा करण्यात यावे जेणे करुन शाळांचे विज बंद होणार नाही  ४ % सादिल मागील दोन वर्षा पासुन जमा करण्यात आलेले नाही ते जमा करण्यात यावे  समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मिळणारे कंम्पोझीट ग्रांट अनुदान  मागील दोन वर्षां पासुन थकीत आहे शाळांचे खात्यात जमा झालेले नाही ते अदा करण्यात यावे समर्ग शिक्षा अंतर्गत स्वच्छतागृह , , रॅम्प शाळा दुरुस्तीसाठी जे अनुदान प्राप्त होते मागील दोन वर्षा पासुन प्रलंबित आहे आता पर्यंत मिळालेले नाही  उर्दु माध्यमांचे उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचे अकोला जिल्ह्यात १४ पदे रिक्त आहेत ते पदोन्नतीने भरण्यात यावे  आणि मागील झालेल्या पदान्नतीमुळे रिक्त झालेल्या शिक्षकांचे जागी समायोजनाने शिक्षक देण्यात यावे जेणे करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही G.P.F. सिलीप शिक्षकांना वेळेवर मिळत नाही ते लवकरात लवकर शिक्षकांना देण्यात यावी  ७ वे वेतन आयोगाचा २ रा आणि ३ रा हफ्ता रोखीने देण्यात यावे  एका वर्षा पासुन शिक्षकांचे वैद्यकीय बिले पास झालेले आहे परंतु पं स  मध्ये निधी नसल्यामुळे पास झालेले वैद्यकीय बिले रोखीन देण्यात आलेले नाही या करिता निधी उपलब्ध करुन देण्यात यावे  बदली पोर्टल प्रोफाइल मध्ये शिक्षकांचे मिडल नांव दर्शविण्यात आलेले नाही हि चूक दुरुस्त करण्यात यावी उपरोक्त  सर्व प्रलंबित मुद्द्यांवर अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी शिक्षकांचे सदर प्रलंबित समस्या सोडविण्या बाबत आश्वासन दिले या वेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटने चे पदाधिकारी यांनी एकाच दिवशी सहा अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली त्यामुळे सर्व शिक्षक बांधव संघटना च्या या कार्याचे कौतुक करीत आहे  यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे शब्बीर अहेमद शेख मनानं नावेद उल्लाह खान नावेद अंजुम प्रकाश राठोड सखाउल्लाह खान अब्दुल रशीद शजर खान आदी प्रामुख्याने उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे