बार्शीटाकळी येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न१८३ रुग्णानी घेतला शिबिराचा लाभ

बार्शीटाकळी येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न
१८३ रुग्णानी घेतला शिबिराचा लाभ 
बार्शीटाकळी प्रतिनिधी 

           स्व.संजय पुंडलिकराव वाघमारे यांच्या ९ व्या स्मृतीदिनानिमित्त आज दिनांक 24 जुलै 2022 रोजी बार्शीटाकळी येथे भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात अकोला येथील सुप्रसिद्ध डॉक्टर यांनी सेवा दिल्या. त्यात प्रामुख्याने डॉ. विनय खंडेलवाल ( MD med,मधुमेह व दमारोग तज्ञ ) डॉ.प्रतीक लढ्ढा ( Uro Surgon,मूत्रपिंड शल्यचिकित्सक ) डॉ.अभिजीत शिरसाट ( MBBS,D.Orthoअस्थीरोग तज्ञ ) सुविधा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्जिकल,क्रिटीकल केअर सेंटर अकोला यांचा समावेश होता. यावेळी भागोदय आरोग्य व शिक्षण बहुद्देशीय संस्था चे लिंक वर्कर बाळकृष्ण उताने , महेंद्र वानखडे , किशोर राठोड , अंकुश अंभोरे यांनी सेवा दिली. 
       सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ.सै.तनवीर जमाल , डॉ. रवि कापकर यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे उदघाटन श्रीमती निर्मलाताई संजय वाघमारे यांनी केले . सदर शिबिरामध्ये 183 रूग्णनी लाभ घेतला . यावेळी बि पी , शुगर ,रक्ताच्या विविध तपासणी व औषधीचे वाटप करण्यात आले .        
कार्यक्रमाला महाराष्ट्र लॅब ,जनता लॅब,ओम पाटिल,प्रवेश करवाडे डॉ. निवृत्ति पातोंड यांनी सहकार्य केले. यावेळी अनंत केदारे,प्रकाश माणिकराव,विष्णु अगाशे,मारोती हरने, पिंटू भगत,अवि भुजाडे,संजय राजुरकर,बबन ढेंगळे , पवन वाघमारे,सागर धात्रक, राजेश खुळे ,संकेत खोपे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशालीताई केदारे यांनी तर आभार प्रदर्शन नितेश वाघमारे यांनी केले .

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे