वंचित बहुजन आघाडी ने मिळवून दिला शेतकऱ्यांला न्याय...

वंचित बहुजन आघाडी ने मिळवून दिला शेतकऱ्यांला न्याय
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
आज दिनांक 22 जुलै 2022 रोजी बार्शिटाकळी तालुक्यातील ग्राम चिंचोली रुद्रायणी येथील दुर्गा सिंग मदन सिंग राठोड यांचे पी एम किसान योजनेचे चार हजार रुपये त्यांच्या खात्यात घेऊन पडले होते. त्यांना आपल्या मुलीच्या एडमिशन साठी पैशाची गरज पडली म्हणून ते पैसे काढण्यासाठी बँकेत गेले तर बँक मॅनेजरने पैसे देण्यास मनाई केली बँक मॅनेजर सांगितले तुमच्यावर आधीच शेतीचे कर्ज असल्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही गेले आठ दिवस त्या इसमाने बँकेत चकरा मारून त्यांना पैसे मिळत नव्हते म्हणून त्यांनी वंचित बहुजन युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनिक यांच्याशी संपर्क साधला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिनांक 21 सात 2022 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा धाबा येथे जाऊन बँक मॅनेजरशी संपर्क साधला असता त्यांना विचारण्यात आले पी एम किसान योजनेचे पैसे तुम्ही का देऊ शकत नाही त्याचं काही लेखी तुमच्याकडे आहे का पि. एम. किसान योजनेचे पैसे कोणी अडवू शकत नाही या गोष्टीचा पाठपुरवठा करून बॅक मॅनेजरला दुर्गा सिंग राठोड यांचें पि.एम.किसान योजनेचे पैसे ( हप्ता )देण्यास सांगितले तेव्हा बँक मॅनेजर नाही तात्काळ त्यांची चार हजार रुपये त्यांना स्वाधीन केले बँकेत असलेल्या बऱ्याच खातेदाराने वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले यावेळी त्यांच्या सोबत तालुकाध्यक्ष अमोल जामनिक , महासचिव अक्षय राठोड , संघटक कृष्णा दहात्रे सोबतच , मिलिंद करवते, श्रीकृष्ण देवकुणबी ,भूषण खंडारे, जनार्दन खील्‍लारे, हरीश रामचवरे ,यांनी सहकार्य केले आणी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनीक यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की कोणत्याही शेतकऱ्यांना जर कोणत्याही बॅक शाखेत त्रास देत असतील तर त्यांनी वंचित बहुजन आघाडी चे तालुका कार्यालय बार्शिटाकळी येथे संपर्क साधावा असे आवाहन तालुका अध्यक्ष अमोल जामनीक याांनी केले आहे  

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे