सततधार पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्या वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने मागणी

संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्या वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने मागणी
बार्शिटाकळी प्रतिनिधी
आज दिनांक 20/जुलै 2022 रोजी बार्शिटाकळी चे तहसीलदार श्री गजानन हामद यांना वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात आली.
अतिवृष्टी मुळे बार्शिटाकळी शहर व तालुक्यातील शेतकरी व पूरग्रस्त शेतकरी घराची झालेली पडझड पाणी पुसून झालेले नुकसान या सर्व पूर परिस्थितीची पाहणी व सर्वेक्षण करून पूरग्रस्त लाभार्थ्यांना तात्काळ भरपाई मिळण्याकरिता वंचित बहुजन आघाडी तालुका वतीने मागणी करण्यात येत आहे गेल्या सात आठ दिवसापासून बार्शीटाकळी तालुक्यामध्ये पाऊस सुरू आहे तसेच नदी नाल्यांना पुराचे पाणी सुद्धा वाढत आहे अतिवृष्टी आणि सतत धार पावसामुळे 19 जुलै पर्यंत तालुक्यात अंदाजे 40 ते 50 घराची पडझड झाली असून पाण्याखाली गेलेल्या पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे यामध्ये सोयाबीन कपाशी टूर आदी पिकाचा समावेश आहे तालुक्यातील रविवार रात्रीपासून सुरू झालेला सतत धार पाऊस सोमवार संध्याकाळपर्यंत चालू होता त्यामुळे नदी व नाल्यांना पूर येऊन ग्रामीण भागातील आणि बार्शीटाकळी शहरातील विविध परिसरातील घरामध्ये पावसाचे पाणी साचल्याने संबंधित कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहे व शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांची सुद्धा नासाडी झालेली आहे अतिवृष्टी व सतदार पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या पिकांचे व शेतीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच पावसाचे पाणी साचल्याने घराचे त्वरित पंचतारा करावे आणि घरात पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या घरांचे सुद्धा पंचनामे करून नुकसान भरपाईचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी तालुक्याच्या वतीने करण्यात आली असून निवेदन देते वेळी वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुका प्रमुख दादाराव सुरडकर, प्रकाश वाहुरवाघ सभापती प.समीती , अमोल जामनिक तालुकाध्यक्ष युवक आघाडी, उज्ज्वल गडलींग, रोहिदास राठोड प.स.सदस्य , जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, दादाराव पवार प.स.सदस्य, दिनेश मानकर, गोबा शेठ, अक्षय राठोड, श्रावण रामदास भातखडे नगरसेवक, नितेश खंडारे, सै. रियासत, डीगांबर मैसने सरपंच, अनिल खंडारे, श्रीकृष्ण देवकुणबी, हरीष रामचवरे, मिलींद करवते, शेख सलीम महान, शुध्दोधन गवई, सुबोध गवई, रामदास गवई, भुषण सरकटे, रक्षक जाधव, भुषण खंडारे, गजानन खाडे, गजानन जाधव, अतीक जाधव, राहुल ईगळे, चेतन जामनीक, रवि ईगळे, धम्मपाल जामनीक, महेंद्र ईगळे, सुरज जामनीक तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी चे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते इत्यादी कार्यकर्ते यांच्या सह्याचे निवेदन बार्शिटाकळी चे तहसीलदार श्री गजानन हामद यांना देण्यात आले 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे