बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे बकरी ईदची परिस्थिती लक्षात घेऊन मौलाना व प्रतिष्ठित नागरिकांची सभा
बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे बकरी ईदची परिस्थिती लक्षात घेऊन मौलाना व प्रतिष्ठित नागरिकांची सभा.
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
येणारा बकरी ईद सण शांतता पूर्ण पार पाडण्यासाठी स्थानिक इमाम,मौलवी व प्रतिष्ठित नागरिकांची सभा आज सायंकाळी पाचच्या सुमारास बार्शिटाकळी पोलिस स्टेशन चे ठाणेदार संजय सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
सभे मध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त असे प्रतिपादन ठाणेदार संजय सोळंके यांनी केले. सभे मध्ये नगरअध्यक्ष हाजी मेहफुज खान, जमिअत ए उल्मा चे तालुका अध्यक्ष तसेच मिनारा मस्जिद चे इमाम व खतीब मौलाना अब्दुल सलाम, उपाध्यक्ष तसेच जामा मस्जिद चे इमाम व खतीब मौलाना अजीज उललाह खान,मौलाना एजाज,मौलाना तौफिक,समाज सेवक मोहम्मद सलीम महक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेचे सूत्र संचालन व आभारप्रदर्शन खुफिया विभाग चे किशोर पिंजरकर यांनी केले तर टाऊन चे नागसेन वानखेडे यांनी परिश्रम केले.
Comments
Post a Comment