बार्शिटाकळी येथे कारगिल विजय दिवस साजरा
बार्शिटाकळी येथे कारगिल विजय दिवस साजरा
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शीटाकळी येथे कारगिल विजय दिवस माजी सैनिक आणि शहीद परिवार यांच्या वतीने रॅली काढून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, मागच्या वर्ष प्रमाणे या वर्षी सुद्धा कौलखेड चौक येथून बार्शी टाकली बाय पास पर्यंत सर्व माजी सैनिक यांच्या वतीने शहीद अमर रहे, भारत माता की जय, या उद्धघोसह रैली काठण्यात आली होती या मुळे सर्व परिसर दना नुन गेला,यावेळेस संघटनेचे माजी सैनिक देविदास काजगे, अर्जुनराव बुधनेर, श्रीकृष्ण आखरे, संतोष च-हाटे, राहुल बोडखे, अनिल ठाकरे, विलासराव पतींगे, विजय सपकाळ, अवी खाडे, रवींद्र शित्रे, उमेश नागे, अकलिमोद्दीन, रंगराव जाधव, समस्त माजी सैनिक सदर रैली मध्ये सहभागी झाले होते. शेवटी छोटे खानी कार्यक्रम घेण्यात आला या मध्ये विशेष आमंत्रित एन सी सी कॅम्प चे अधिकारी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार, तहसील कर्मचारी उपस्थित होते, राष्ट्र भक्ती, देशभक्तीमय वातावरणात हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे पार पडला.
Comments
Post a Comment