स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गुलाम नबी आझाद महाविद्यालयाची अभुतपुर्व रॅली
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गुलाम नबी आझाद महाविद्यालयाची अभुतपुर्व रॅली
बार्शीटाकळी: स्थानिक बार्शिटाकळी गुलाम नबी आझाद महाविद्यालयाची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभूतपूर्व रॅलीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. भारत सरकार यांच्या निर्देशानुसार व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियानाअंतर्गत अद्भुतपूर्व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण तीन महाविद्यालयांचा समावेश होता. सोबतच ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी सुद्धा सामील झाले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकरराव पवार यांच्या नेतृत्वाखाली या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य संख्येने विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. नर्सिंग कॉलेज कान्हेरीसरप व महात्मा फुले कनिष्ठ विद्यालयाचे सर्व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. हातात दोनशे राष्ट्रध्वज घेऊन महाविद्यालयाच्या प्रांगणातुन रॅलीची सुरूवात करण्यात आली. सर्वप्रथम तहसील कार्यालय बार्शीटाकळी, नंतर आठवडी बाजार, जामा मशीद, ग्रामीण रुग्णालय व नंतर आठवडी बाजार, पुन्हा तहसील कार्यालयामध्ये या रॅलीची सांगता करण्यात आली. एकूणच सर्व बार्शीटाकळी शहरामधे देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा घरघर तिरंगा अशा प्रकारचे नारे देऊन अवघ्या बार्शीटाकळी शहरामध्ये आनंदमय वातावरण सकाळी सकाळी निर्माण झाले होते. रॅलीला संबोधित करण्यासाठी मा प्राचार्य पवार सर व माननीय तहसीलदार साहेब यांची भाषणे झाली. संबोधित करताना, देशभक्तीची जनजागृती आपल्या सभोवताली विषेशत: युवा वर्गामध्ये निर्माण करता येईल याचा सर्वांनी प्रयत्न करावे, असे पवारसाहेब म्हणाले. अनेक क्रांतीविरांनी देशाच्या स्वातंत्र्याकरिता आपल्या प्राणांची आहुती देऊन आझाद भारताची निर्मिती केली, या सर्वांची प्रेरणा येणाऱया काळामध्ये नवीन पिढीमध्ये निर्माण व्हावी व उत्तरोत्तर देशाची प्रगती व्हावी ही अपेक्षा त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केली. उल्लेखनीय बाब म्हणजे शहरातील नागरिक हातात राष्ट्रध्वज घेऊन असंख्य संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रॅलीला कुठेही गालबोट लागू नये व शांतता प्रस्थापित राहावी या उद्देशाने पोलीस विभाग, बार्शीटाकळी सज्ज झाला होता. विद्यार्थ्यांना शपथ देऊन व राष्ट्रगीत घेऊन या रॅलीची सांगता करण्यात आली. सर्वांना पाण्याची व्यवस्था प्रा. वैभव धात्रक यांनी केली होती. एकुनच रॅलीचे संपूर्ण नियोजन व यशस्वितेकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. व्हि एस उंडाळ, डॉ व्हि बी कोटंबे, तसेच ग्रामीण रुग्णालय बार्शी टाकळी येथील कन्सल्टंट डॉ तिडके साहेब यांनी अथक परिश्रम घेतले. तिनंही महाविद्यालय एकत्र येऊन अशा प्रकारची अभूतपूर्व रॅली चे आयोजन प्रथमच झाली अशा प्रतिक्रिया शहरात उमटू लागल्या ही विशेष बाब नोंद करण्यासारखी आहे.
Comments
Post a Comment