महान गावात अवैध धंदे सुरुच विशेष पथकाचा आणखी एका अड्ड्यावर छापा
महान गावात अवैध धंदे सुरुच
विशेष पथकाचा आणखी एका अड्ड्यावर छापा
बार्शिटाकळी प्रतिनिधी
जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या आदेशा नुसार जिल्ह्यात व पिंजर पोलिस ठाण्याअंतर्गत महान येथे अवैध धंदे करण्याचे प्रयत्न केले.आहेत मात्र पिंजर पोलिस ठाण्याअंतर्गत अवैध धंदे सुरुच असल्याचा पुरावाच विशेष पथक देत आहे.
या पथकाला दरोज शहरातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकतरी अवैध धंदा सुरू असतांना दिसून येत आहे.त्यामुळे त्या धंद्यांवर कारवाई करुन संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.तरीही आपल्या पोलिस ठाण्याअंतर्गत अवैध धंदे बंद असल्याचे ठाणा अधिकारी यांचेकडून सांगण्यात येत.असेल तरीही विशेष पथक सुरू असलेल्या अवैध धंदे रंगेहाथ पकडत असल्याने संबंधित महान पोलिस चौकीच्या जमादारवर कोण कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आज२४ऑगस्ट रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली वस्तापुर व महान बस स्थानक चोकात जुगारावर छापा टाकला असता पांच संशयित ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करून जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.आहेत पोलिस विशेष पथक अवैध धंद्द्यावर रेड करण्या कामी पेट्रोलिंग करीत असताना, वस्तापुर व महान बस स्थानक चोकात वरली जुगाराची आकडयावर नगदी पैसे लावून हारजीत जुगार खेळत असतांना.(१)सै.समीर सै.जाकीर.वय२५ बस स्टॅण्ड महान (२)शेख समीर शेख खलील वय २५ राहणार गुलीस्ता नगर अमरावती (३)सै.शाहबुद्दीन शेख जलीलोद्दीन राहणार गुलीस्ता नगर अमरावती(४)दत्ता मारुती काळे वय (५९) राहणार वस्तापुर.हे मिळून आले.तर (५)विष्णू ठोंबरे हा पळून गेला.त्याच्याकडे वरली साहित्य नगदी १२ हजार ७८० रु.तिन मोबाईल फोन ३० हजार रुपयांचा एक मोटरसायकल ८०हजार रुपयांचा असा एकूण १लाख २२हजार ७८०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.व त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार बंदी कायद्या अंतर्गत पिंजर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर व अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे..
Comments
Post a Comment