जिल्हा परिषद उर्दू शाळा महान येथील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली भारतीय स्टेट बँक मधील कारभाराची माहिती

*जिल्हा परिषद उर्दू शाळा महान येथील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली भारतीय स्टेट बँक मधील कारभाराची माहिती*

शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट
प्रतिनिधी बार्शिटाकळी
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण सोबतच आपल्या परिसरातील महत्त्वपूर्ण बाबीची महिती व्हावी व विध्यर्थी परिपूर्णपणे सक्षम व्हावी याकरिता बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा महान येथील विज्ञान अध्यापिका शगुफ्ता जमाल व उपक्रमशील शिक्षक शाहिद इक्बाल खान यांनी गुरुवारी केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर व मुख्याध्यापक शफीक अहमद खान राही यांच्या मार्गदर्शनाखाली महान येथील भारतीय स्टेट बँक शाखा येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेटीचे आयोजन केले होते यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय स्टेट बँक शाखा महानचे ब्रांच मॅनेजर मयूर तेलगोटे यांनी बँकिंग व्यवहाराबद्दल चालू खाता बचत खाता सुकन्या समृद्धी योजना इत्यादी महत्त्वपूर्ण योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना आपल्या भावी जीवनात बँकिंग व्यवहार करताना कोणत्या प्रकारची अडचण निर्माण होऊ नये याबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच स्कॉलरशिप इत्यादी अकाऊंट साठी बँक सदैव तत्पर असल्याची गवाही बँक मॅनेजर मयूर तेलगोटे यांनी दिली यावेळी बँक मॅनेजर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वतः विद्यार्थ्यांना कोणती स्लिप कशा प्रकारे भरावी याचे सुद्धा प्रत्यक्ष दाखवले विद्यार्थी सर्व गुण संपन्न व्हावे या करिता शाळा च्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात विद्यार्थ्यांनी भारतीय स्टेट बँक शाखा चे विभागाबद्दल माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांच्याकडून याबाबत शाळा च्या वतीने एक नोट तयार करून घेण्यात येते जेणेकरून विद्यार्थ्यांनी घेतलेला अनुभव त्यांना दीर्घकाळ स्मरण राहावे यावेळी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँक कर्मचारी बँक लिपिक मयुरी मॅडम यांनी सहकार्य केले यावेळी विज्ञान अध्यापिका शगुफ्ता जमाल यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केल्याबद्दल भारतीय स्टेट बँक शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले तसेच अत्यंत व्यस्थ असताना सुद्धा विद्यार्थ्यांसाठी वेळ दिल्याबद्दल ब्रांच मॅनेजर मयूर तेलगोटे यांचे विशेष आभार मानले यावेळी शिक्षक नदीम खान तसलीम खान रिजवान अहमद मुजीब मोहम्मद बेग जाहे दूर रहमान मुख्याध्यापक प्रकाश राठोड राहुलला खान अब्दुल शोहेब अब्दुल हकीम दानियल कुरेशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे