राजकीय हेवेदावे दूर ठेवून झाले रक्षाबंधन.धर्म जात इतर राजकीय भेदभाव ला मिळाला दुरावा सुशांत दादा बोर्डे यांची अनोखी माणूसकी ची रक्षाबंधन.......

राजकीय हेवेदावे दूर ठेवून झाले रक्षाबंधन.
धर्म जात इतर राजकीय भेदभाव ला  मिळाला दुरावा 
सुशांत दादा बोर्डे यांची अनोखी माणूसकी ची रक्षाबंधन.
  
  हिंदू संस्कृती मध्ये प्रत्येक नात्याला सण उत्सवाचा स्पर्श आहे .माणुसकीतला  दुरावा दूर व्हावा या अनुषंगाने  प्रत्येक सण उत्सवाला या देशात वेळोवेळी प्राधान्य दिले आहे .यामुळे जाती धर्म इतर भेदभाव  च्या पलीकडे अनोख नात निर्माण करणार बहीण भावाचे नात आहे.
-- हिंगणी गावात स्थायिक असलेले एकेकाळी काँग्रेस पक्षाची  निष्ठा राखणारे हारून शहा यांच्या प्रकृती मध्ये बिघाड झाला आहे . अर्धांग वायूच्याअवस्थे मधे मा.तालुका अध्यक्ष हारून शहा सध्या हालकीच्या परिस्थिती चा सामना करत असून परिवाराची धुरा याही परिस्थतीत सांभाळत आहेत . तसेच त्यांच्या परिस्थितीची   जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी  महिला आणि बाल कल्याण सभापती पती सुशांत दादा बोर्डे यांना माहिती मिळताच  रक्षाबंधन चा सण हारून शहा यांच्या घरी साजरा करण्याचा मानस सुशांत दादा बोर्डे यांनी धरला .
यावेळी मा. तालुका अध्यक्ष हारून शहा यांच्या पत्नीच्या हस्ते नव्या नात्याचे बंधन निर्माण करून रक्षाबंधनाच्या शुभ पावणावर राखी बांधून जिव्हाळ्याचा नात्याला सुरवात करून दिली . यावेळी हारून शहा यांच्या परिवारात या शुभ क्षणाचा आनंद दिसून आला होता .

--  रक्षाबंधनाच्या सणाच्या उत्सवाचे औचित्य साधून जुन्या मैत्रीला नात्याचे स्वरूप सुशांत दादा बोर्डे यांनी हारून शहा च्या परिवाराला दिले .
राजकीय क्षेत्रात तरबेज कार्यशैली राहिलेले हारून शहा यांची परिस्थिती बघता कुठल्याही राजकीय पक्षाने  त्यांची खबर घेण्याचे महत्व दिले नाही.समाजकारण राजकारण यांच्या मध्ये माणुसकी जिवंत असणे हे गरजेचे आहे . रक्षाबंधनाच्या या नात्याला अनोखे माणुसकीचे बंधन बनवणाऱ्या शुभ क्षणाची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे .तसेच या अनोख्या माणुसकीच्या रक्षाबंधनाच्या ग्वाहिला  राजीक शहा , विनोद आठवले , रोशन शहा, संजय शर्मा ,गणेश पांडे , विनोद अंबुस्कर, अनिकेत अंबुस्कर , मयूर बेलगे, तुकाराम आठवले ,अमोल रोठे  ,अरुण रोठे, सुमित अंबुस्कर, उत्तम वाकोडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....