बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांची अवैध देशी दारू तसेच जुगार अड्ड्यावर छापा
बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांची अवैध देशी दारू तसेच जुगार अड्ड्यावर छापा
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
आज दिनांक 26 ऑगस्ट 2012 रोजी पोळा उत्सव साजरा करत असताना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात पेट्रोलिंग दरम्यान पोलीस उपनिरीक्षक निलेश तारक व पोलीस स्टेशनच्या अंमलदार यांनी गोपनीय माहिती वरून ग्रामवता विजोरा एरंडा परंडा येथे अवैध देशी दारू तसेच गावठी दारू तसेच जुगारावर धाड टाकून एकुण 16 इसमांवर कलम 65 (ई) महा. दारूबंदी कायदा तसेच कलम 12(अ) महा. जुगार प्रतीबंधक कायद्या नुसार कारवाई करण्यात आली आहे.
तसेच अवैध दारू विक्री करणारे विकास दिपला राठोड वय ४४ वर्षे, निशांत अरुण मेश्राम वय ३२ वर्षे, रा. एरंडा (पसार झालेला) शायदा सैय्यद बाबन वय ५८ वर्षे रा. परंडा, श्रीपाल वसंत जंजाळ वय ५० वर्षे रा. विझोरा, सुनील श्रीकृष्ण ढवळे वय ३४ वर्षे रा. विझोरा, बाबुलाल भानुदास गवई वय ३८ वर्षे रा विझोरा, अक्षय कैलास जंजाळ वय २६ वर्षे रा विझोरा, रामकृष्ण भगवान चौरीपगार वय ६६ वर्षे रा येवता, तसेच जुगार खेळणारे बाळु किसन मेश्राम वय ५० वर्षे रा एरंडा, नागोराव बाळकृष्ण भोंगरे वय ४३ वर्षे रा एरंडा, नागराज चिंतामण मेश्राम वय ५६ वर्षे रा एरंडा, रूपचंद बळीराम मेश्राम वय ६० वर्षे रा एरंडा, नंदु गौतम मेश्राम वय २८ वर्षे रा एरंडा, विलास नाशिकराव निकोशे वय ४९ वर्षे रा एरंडा, अमोल रामकृष्ण निकोशे वय ३० वर्षे रा एरंडा, विकास त्र्यंबक मेश्राम वय 40 वर्षे रा एरंडा यांचे विरूद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. नमुद नमुद आरोपीतांकडुन देशी व गावठी दारू चा साठा तसेच जुगार साहित्य एकुण २९.६७० रूपयाचा माल जप्त करण्यात आला
Comments
Post a Comment