क्रांतिकारी चळवळीचे महानायक ----राष्ट्रसंत सेना महाराज
क्रांतिकारी चळवळीचे महानायक ----राष्ट्रसंत सेना महाराज
-------------------------------
हरिहर एम पळसकर
आकोट जि अकोला
(9922361188 )
------------------------------
भारत देश हा असंख्य नररत्नाची खाण आहे.या खाणीतील हिरे आपल्या अलौकिक कर्तृत्वाने जनसामान्यांच्या हृदयात कायम घर करून बसले आहेत.
त्यात महाराष्ट्र भूमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे
या भूमीने संपूर्ण भारत देशाला दिशा देण्याचे काम केले आहे.
ही दिशा देतांना समाजाला एकत्रित ठेवण्याचा मोठा संदेश महाराष्ट्र भूमीतूनच उदयास आला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
समाजसुधारना व समाज जागृती या क्षेत्रात महाराष्ट्रातील साधुसंत जणांचे मोठे योगदान आहे.
अशा अलौकिक साधू- संतांमध्ये मध्य प्रदेशातील बांधवगड येथे जन्मलेल्या राष्ट्रसंत सेना महाराजांचे नाव मोठया आदराने घेतल्या जाते त्यांचे समाजप्रबोधन त्यासाठी कारणीभूत ठरले आहे.
सेना महाराजांच्या काळात समाजात मोठया प्रमाणात अंधश्रद्धा, बुवाबाजी, जादूटोणा याचे प्रस्थ वाढले होते समाजात या माध्यमातून अनिष्ठ रूढी ,परंपरांचा उदय झाला त्याने पछाडलेला समाज हा पुर्णतः अधोगतीच्या मार्गाने जात होता.
अशा विपरीत परिस्थितीत या साऱ्या घातक रूढी , परंपरांच्या विरोधात सेना महाराजांनी दंड थोपटले
त्यांनी समाजाला विज्ञानवादी दृष्टी बहाल करण्याचे मोलाचे कार्य केले.
त्यांनी अंधश्रद्धा ,कर्मकांड, दैववाद, तथा अनिष्ट रूढी ,परंपरांच्या विरोधात विज्ञानवादी विचार मांडल्याचे त्यांच्या अभंगातून सिध्द होते
//गळा- माळ भस्मपितांबर साधुचा आचार दाखवितो सेना म्हणे ऐसा दांभिका भजती दोघेही जाती अधोगती //
वरील अभंगाच्या ओळीतून संत सेनाजींनी धर्माच्या नावाखाली वाईट कृत्य करून पोट भरण्यापेक्षा श्रम, मेहनत व कष्ट करण्याचा संदेश दिला.
पोथी, पुराणातील भाकडकथा सांगून समाजाची दिशाभूल करू नका गळी ,कपाळी भस्म पट्टे ओढुन बाहय देखाव्याचा आव आणून लोकांना भुलविनाऱ्या पोटभरूना तथा खोटे पुराण सांगणाऱ्याच्या खोटरडेपणावर आपल्या अभंगातून प्रहार केला
म्हणूनच सेनाजींना आपल्या कार्यात भक्तीमार्गापेक्षा मानावमुक्तीचा लढा महत्वाचा वाटतो.
सेनाजींच्या साहित्याचा बारकाईने अभ्यास केला असता ,त्यांनी व्यवस्थेबरोबरच व्यसनाधीनतेला कडाडून विरोध केला आपल्या एका अभंगातून संदेश देतांना संत सेना महाराज म्हणतात
// आला काळ विपरीत बुद्धी
जुगारीचे छंदी नागवला
सेना म्हणे धन घालविता दुःखी
परी-हरी मुखी येईचना//
म्हणून व्यसनासारख्या दुर्गुणांपासून अलिप्त राहून आपले कुटुंब सुखी व स्वयंपूर्ण ठेवून समृध्द समाजरचनेतून उज्वल राष्ट्रनिर्माणास मदत तर होईलच शिवाय वाईट वृत्तीचा नाश होईल.
सेना महाराजांचे संस्कृत भाषेबरोबरच पाली भाषेवर प्रभुत्व असल्याने ते बहुभाषिक संत असल्याचे सिद्ध होते
त्यांनी आपल्या अभंगातून बहुजन समाजाला न्यायनिष्ठा, कर्तव्य व सत्यनिष्ठेचे बीजारोपण केले
त्यांचे समकालीन संत नामदेवजी ,संत रविदास, संत कबीर,संत गोरोबाकाका आदी संतांचे तत्कालीन कार्य म्हणजे अज्ञानी समाजाला भयमुक्त करून विज्ञानवादी विचार रुजवून समतावादी राज्य निर्माण करणे व सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविणारे होते.
सेना महाराजांची जयंती साजरी करतांना त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हायला हवा
राष्ट्रसंत सेना महाराज एका अभंगात म्हणतात
// कुसंगतीने वाढते अज्ञान /जळते हे ज्ञान सत्य माना //
संत सेना महाराज म्हणतात ,वाईट संगतीमुळे मानवी मेंदूचा विकास खुंटतो आणि आयुष्य रसातळाला जाते असा संदेश आपल्या अभंगातून दिला.त्यांनी तथागत गौतम् बुध्द ,महापंडित उपाली ,सम्राट चंद्रगुप्त मौर्य व सम्राट अशोक यांच्या विचाराला प्रेरणा मानून त्यांनी आजन्म मानव मुक्तीचे कार्य केले
संत सेना महाराजांनी बाराव्या शतकात वारकरी धर्माचे आंदोलन उभे करून वैचारिक लढ्याला सुरुवात केली त्यांना पंजाबी ,हिंदी ,पाली , संस्कृत भाषेसह १५ ते १६ भाषा अवगत होत्या
त्यांनी महाराष्ट्र ,कर्नाटक , बिहार ,राजस्थान ,
राजस्थान ,तमिळनाडू ,
मध्यप्रदेश आदी राज्यात समतावादी विचारांचा वसा आणि वारसा सक्षम पने चालवून सैनपंथ नावाची चळवळ उभी करून समाजाला परिवर्तनाचा मार्ग दाखविला.
अशा महानायकाचा जन्म ८ मार्च ११९० रोजी मध्यप्रदेशातील बांधवगड येथे झाला तर महापरिनिर्वाण २० ऑगष्ट १२४४ मध्ये झाले आज त्यांच्या ७७८ व्या स्मृतिदिना निमित्य विनम्र अभिवादन - 💐💐💐💐💐💐💐💐
सर्व नाभिक समाज बांधवांना विनंती करतो की राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांचा स्मृतिदिन कृपया 20 - 8 -2022 रोजी तारखेनुसार सर्वत्र साजरा होत असतो
आपणही आपल्या गावात, तालुक्यात ,आणि जिल्ह्यात याच दिवशी साजरा करावा
तारखेनुसार स्मृतिदिन साजरा केल्यास संपूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा एकाच दिवशी आणि एकाचं तारखेला मोठ्या प्रमाणात साजरा होऊ शकतो
कारण तिथी ही दरवर्षी बदलत राहते
तारखेनुसार जयंती आणि स्मृतिदिन साजरा केल्यास त्याला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त होते
राष्ट्रसंत सेना महाराज आपले महापुरुष आहेत देशात सर्व महापुरुषांच्या जयंत्या आणि स्मृतिदिन जर तारखेनुसार होत असतील तर राष्ट्रसंत सेनामहाराज यांचा स्मृतिदिन आणि जयंती सुद्धा तारखेनुसारच व्हायला हवी
कारण या देशातील कारभार हा ग्रामपंचायत पासून तर संसद भवनापर्यंत तरखेनुसारच चालतो तिथी नुसार नाही
जे लोक आपल्याला तिथीनुसार जयंती आणि स्मृतिदिन करायला लावतात ते लोक आपले कालनिर्णय जानेवारी महिन्यात मार्केटला का आणतात तिथीनुसार एप्रिल महिन्यात गुढीपाढव्याला बाजारात का आणत नाहीत
आपले काही समाजबांधव स्मृतिदिन हा चुकीच्या पद्धतीने साजरा करतात
त्यात कुणी सुधारणा करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला समाजद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करतात आपण समाजाला चुकीच्या दिशेने नेत आहोत हे मात्र विसरून जातात
जयंती हा जसा जन्मदिवस आहे तसाच स्मृतिदिन हा मृत्यूचा दिवस आहे मात्र याच दिवशी आम्ही ढोलताशे वाजवतो ,धुमधडाक्यात मिरवणूक काढतो , भंडारा करतो म्हणजेच आम्ही मरणाचा दिवस अतिशय चुकीच्या पद्धतीने साजरा करतो
जयंती आपण धुमधडाक्यात साजरी करायला पाहिजे
आता आपण बदललो पाहिजे कारण परिवर्तन हा जगाचा नियम आहे संपूर्ण जग बदललं जगाच्या परिभाषा बदलल्या ,कालचे जग आज नाही ,आजचे जग उद्या नाही ,उद्याचे जग परवा नाही
रांधा, वाढा, आणि उष्टी काढा या मानवी गुलामगिरीच्या बेडीत बंदीस्त भारतीय नारी आज चंद्रावर जाऊन आली ,ती भारताची राष्ट्रपती बनली ,ती स्वातंत्र्याचा तिरंगा फडकविते हे परिवर्तन , हे बदलतं वास्तव आपण स्वीकारणार आहोत की नाही
शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार की तारखेनुसार हा वाद शासनदरबारी अनेक वर्षे चालला यासाठी इतिहास संशोधकांची समिती गठीत केली काही पंचांग वाल्याचा त्यात समावेश होता शासनाने करोडो रुपये खर्च करून यांना शिवजयंती ची तारीख निश्चित करायला सांगितली सर्वानुमते शासनाने 19 फेब्रुवारी ला सरकारी सुटी सुद्धा जाहीर केली
असे असतांना काही समाजद्रोही लोकांनी आपल्या कॅलेंडर मध्ये शिवजयंती तारखेनुसार आणि तिथीनुसार असा उल्लेख केला
आणि परत तिथी आणि तारखेचा वाद निर्माण केला गेला
आपण आशा प्रकारचे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे आपण जेष्ठ आहात, स्रेष्ठ आहात, ज्ञानवंत आहात, प्रज्ञावंत आहात ,विचारवंत आहात, चिकित्सक आहात, बुद्धिवादी आहात, विवेकवादी आहात ,सत्य,असत्य जाणून आहात, राष्ट्रसंत सेनामहाराजच्या विज्ञानवादी विचाराचे पुरस्कर्ते आहात,समाजाला दिशा देण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे हे जाणून आहात ,सेना महाराजांच्या क्रांतिकारी आणि पुरोगामी विचारधारेचे आपण पाईक आहात ,अनिष्ठ चालीरिती आणि अंधश्रद्धा यावर वार करणारे वारकरी आहात
समाजाला दिशा देण्याचे पवित्र कार्य आणि जबाबदारी आपल्यावर आहे
परत आपल्याला विनंती करतो राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचा स्मृतिदिन आपण 20 ऑगस्ट रोजी तारखेनुसार साजरा करावा ही विनंती
(आम्ही या बाबतीत सन 2009 पासून विविध माध्यमातून जनजागृती करत आहोत त्याचा सकारात्मक बदल दिसून येत आहे ही आनंदाची बाब आहे )
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment