भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देवळीत मोठ्या उत्साहात साजरा आर्मी मधील जवानांच्या हस्ते ध्वजारोहणाची परंपरा कायम
*भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देवळीत मोठ्या उत्साहात साजरा*
*आर्मी मधील जवानांच्या हस्ते ध्वजारोहणाची परंपरा कायम*
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने १३ ते १५ ऑगस्ट हर घर झेंडा अभियान अकोला तालुक्यातील देवळी गावात सरपंच सौ वैशालीताई विकास सदांशिव व ग्रामसेवक अमोलजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार गावकऱ्यांनी प्रत्येक घरावर स्वतः तिरंगा ध्वज विकत घेऊन फडकवला. अमृत महोत्सव निमित्ताने जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांसह आर्मीतील जवान, सरपंच व गावातील मान्यवर मंडळींनी गावात उत्साहात रॅली काढून स्वतंत्राचे जयघोष दिले विशेषत: ग्रामपंचायत देवळी कार्यलया परिसरात प्रथमतः झेंडा उभारून ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला. देवळी गावच्या सरपंच सौ वैशालीताई सदांशिव ह्या सरपंच झाल्यापासून त्यांनी सरपंचाचा ध्वजारोहण करण्याचा अधिकार हा आर्मी मधील जवानांच्या हस्ते करण्याची जी परंपरा चालू केली ती या ७५ व्या स्वतंत्र दिनाला भारतीय सैन्यातील सैनिक मा. शुभम विजय सदांशिव व सैनिक मंगेश बाळू सदांशिव यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन कायम ठेवली त्यामुळे जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही असा आदर्श आपल्या राबवायला हवा असे बोलल्या जात आहे. विकास कामांसह सामाजिक व देशहितासाठी केलेले त्यांचे कार्य हे जिल्हाभरात कुतुहलाने चर्चीले जातात. भारतीय स्वातंत्र्याच्या निमीत्ताने गावात विविध उपक्रमांसोबत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमला प्रोत्साहन मिळावे म्हणून शाळेला आठ दिवसांत साऊंट सिस्टीम ग्रामपंचायतच्या वतीने देण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायत देवळी येथील भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमात सरपंच सौ वैशालीताई विकास सदांशिव, ग्रामसेवक अमोलजी खाडे, ग्रामपंचायत सदस्य देवानंद सदांशिव, सौ. रूपालीताई नवलकार, सौ. वृषालीताई बोबडे, गणेश निमकंडे, श्रीमती मंदाताई राऊत, श्रीमती कल्पनाताई सदांशिव, तंटामुक्ती अध्यक्ष बंडूभाऊ सदांशिव, पोलिस पाटील अशोकराव बोबडे, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक गजानन निखाडे, ग्रामपंचायत कर्मचारी मनिष म्हस्के, स्वच्छतागृही सुरेंद्र सदांशिव, कारगील शहिदपुत्र दिपक भास्करराव पातोंड, जि. प. शाळाचे मुख्याध्यापक अनंता वाघ सर, शिक्षक संजय पाटील गुरूजी, शत्रुघ्न अंभोरे, शिक्षीका नम्रता पाटील मॅडम, बिरकड विद्यालयाचे शिक्षक संजय तायडे गुरूजी, संगणक संचालक नितीन सारसे, माजी सरपंच माणिकराव सदांशिव, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक गणेश निलखन, दशरथ सदांशिव, गजानन पातोंड, अंगणवाडी सेविका अनिता पातोंड, सौ. पंचशीला सदांशिव, महिला बचतगटाच्या सदस्या सौ. वर्षा सदांशिव, सौ. नम्रता बंड, गिऱ्हे दुकानदार, कैलास राऊत, विठ्ठल राऊत यांच्यासह गावातील मान्यवर मंडळी व गावकरी सोबतच विद्यार्थ्यांची प्रचंड उपस्थिती होती.
Comments
Post a Comment