*गुलाम नबी आझाद महाविद्यालयात महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रा प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान संपन्न झाले*
*गुलाम नबी आझाद महाविद्यालयात महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रा प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान संपन्न झाले*
प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनूना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी, जिल्हा अकोला येथे महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान दिनांक १८/०८/२०२२ रोजी ठीक १२.०० वाजता संपन्न झाले.
राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. यात्रेचे प्रामुख्याने तीन टप्पे असून त्यातील एक टप्पा तालुकास्तरीय प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान हा टप्पा महाविद्यालयामध्ये उत्तमरीत्या पार पडला. स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक वाहन (मोबाईल व्हॅन) महाविद्यालयात आली होती. वाहनासोबत आलेल्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना यात्रेबाबतची माहिती दिली.
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकरराव पवार यांच्या व श्री. द.ल. ठाकरे सहाय्यक आयुक्त तथा सदस्य सचिव , जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता समिती अकोला यांच्या मार्गदर्शनाने व श्री. प्रशांत गुल्हाने, वरिष्ठ लिपिक, जिल्हा कौशल विकास ,रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता समिती अकोला यांच्या सहकार्याने उत्तमरीत्या पार पडला. या यात्रेचे आयोजनाच्या यशस्वी ते करता महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी व व करिअर कट्टा अकोला जिल्हा समन्वयक प्रा. भाऊसाहेब गायकवाड तसेच उपप्राचार्य डॉ. अमित वैराळे यांनी जबाबदारी पार पाडली. उपप्राचार्य आर. आर. राठोड, प्रा. सुधीर राऊत , आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. ए. बी. पाटील , रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शरद इधोळे, भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय देशमुख , वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, डॉ.संतोष सुरडकर , सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनीष आहीर , डॉ.सिद्धार्थ वाघमारे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी डॉ. विनोद उंडाळ, डॉ. मनोज देशपांडे, डॉ. भीमराव जैवळ, डॉ. मनोज जाधव, डॉ. दीपक चौरपगार, प्रा.युवराज काळे, प्रा तेजस पाटील , डॉ. कैलास काळे , डॉ. सतीश खोब्रागडे , डॉ. ए.एम. कुटे, प्रा. संजय चव्हाण, प्रा. वैभव धात्रक, मयूर पवार , महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेर कर्मचारी, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment