अमृत महोत्सवामध्ये जि एन ए महाविद्यालयाचा जिल्हास्तरीय सहभाग

अमृत महोत्सवामध्ये जि एन ए महाविद्यालयाचा जिल्हास्तरीय सहभाग
बार्शिटाकळी प्रतिनिधी 
बार्शीटाकळी: आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयाचा सहभाग दिसून आला. शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक शाळा व महाविद्यालयात हा महोत्सव १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान साजरा करण्याचे सूचित केले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशाप्रमाणे हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी अनेक महाविद्यालय मोठ्या उत्साहाने वेगवेगळ्या कार्यक्रमामधुन सामील झाले. महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग यामध्ये सामील झाला. याचाच एक भाग म्हणून बार्शिटाकळी येथील गुलाब नबी आझाद महाविद्यालयांमध्ये अनेक कार्यक्रम यानीमीताने संपन्न झाले. महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत प्रामुख्याने वृक्षारोपण, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर गायन स्पर्धा, स्थानिक ठिकाणी काही घरी जाऊन तिरंगा लावण्याचे आव्हान, तालुका आणि जिल्हास्तरीय रॅलीमध्ये सहभाग यासारख्या उपक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. 
राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. रतनलाल येउल यांच्या नेतृत्वात शनिवारी झालेल्या जिल्हास्तरीय रॅलीमध्ये जि एन ए महाविद्यालयाचा समूह यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. प्रत्येकाच्या हातामध्ये देशाचा राष्ट्रध्वज घेऊन मोठ्या आनंदाने अनेक शिक्षक व विद्यार्थी यामध्ये सामील झाले. अकोल्यातील एल आर टी महाविद्यालयाच्या प्रांगणातुन निघालेली रॅली प्रथम आर एल टी महाविद्यालयाच्या समोरून, मेंन पोस्ट ऑफिस नंतर, भाजीमार्केट, टॉवर चौक, रतनलाल चौक व शेवटी पुन्हा एल आर टी महाविद्यालय अशी या रॅलीची सांगता झाली. अकोला जिल्ह्यातील जवळपास सर्वच महाविद्यालय तिरंगा हातात घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देत उत्साहात सहभागी झाले होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ व्ही एस उंडाळ, डॉ व्ही बी कोटंबे व इतर प्रा वैभव धात्रक, डॉ मनीष अहीर, डॉ संजय देशमुख इ. यांच्या अथक प्रयत्नातून व सहकार्याने रॅलीचे शांततेत आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी मोठ्या आनंदाने सहभागी झाले. सोबतच जिल्हा समन्वयक प्रा येऊल सरांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या जिल्हास्तरीय उपक्रमात सुद्धा महाविद्यालयाचा सहभाग दिसून आला. रॅलीच्या यशस्वीतेनंतर लगेचच एल आर टी महाविद्यालयाच्या प्रांगनात देशभक्ती पर नृत्य, एकांकिका, बक्षीस वितरण व इतर कार्यक्रम आयोजित केले होते. विद्यार्थ्यांच्या हया सर्व बहारदार कार्यक्रमामधुन अकोला वासीयांनमध्ये देशभक्तीचा संदेश व जनजागृती यानीमीताने करण्यात आली. अशा प्रकारच्या देशभक्तीपर रॅलीचे थाटात आयोजन अकोला येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आले, असा सुर सर्वच स्थरातुन ऐकायला मिळत आहे. अनेक क्रांतीकारानी आपल्या प्रानाची आहुती देवुन आझाद भारताची निर्मिती केली, अशा थोर महापुरुषांची ओळख व आठवण पुढील पिढीमध्ये तेवत रहावी या उद्देशाने व अमृत महोत्सवानिमित्त हया प्रकारचे आयोजन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे