गौण खनिज प्रकरणी मुख्यमंत्री यांच्या कडुन दोषींवर कारवाईची मागणी.... म.रा.ग्रामीण पत्रकार संघातर्फे बार्शिटाकळी तहसील कार्यालय येथे निवेदन
म.रा.ग्रामीण पत्रकार संघातर्फे बार्शिटाकळी तहसील कार्यालय येथे निवेदन
गौण खनिज प्रकरणी मुख्यमंत्री यांच्या कडुन दोषींवर कारवाईची मागणी....
म.रा.ग्रामीण पत्रकार संघातर्फे बार्शिटाकळी तहसील कार्यालय येथे निवेदन
बार्शिटाकळी
बार्शिटाकळी तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे वतीने मुख्यमंत्री म. रा यांना तहसीलदार कार्यालय बार्शीटाकळी द्वारे निवेदन देण्यात आले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की वर्धा,यवतमाळ, नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाचे उत्खननातील गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणात तक्रारदारावर भ्रष्ट दोषी अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांकडून प्रचंड दबाव आणला जात आहे.एवढेच नाही तर दोन वर्षापासून दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे.मात्र तक्रारदार पत्रकार अमोल ओमप्रकाश कोमावार यांचे जीवाशी खेळण्याचा प्रकार भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.रेल्वेप्रकल्पातील उत्खननातील गौणखनीज कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय शासनाचा महसूल बुडून रेल्वे कंत्रांटदार खुल्या बाजारात विक्री करत असल्याची प्रत्यक्ष पुरव्यानीशी तक्रार यवतमाळ येथील तहसीलदार,व जिल्हाखनीकर्म अधिकारी यांना दिनांक २८/०८/२०२० रोजी दिली आहे परंतु दोन वर्षापासून कुठलीच कारवाई संबंधितावर केलेली नाही , सतत पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही केली नसल्याने तक्रारदार पत्रकार अमोल कोमावार यांनी आमरण उपोषण केले,त्यानंतर संबंधित तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी कारवाई करण्याची लिखित स्वरूपात आश्वासन देऊन कारवाई करण्यास सुरुवात केली. पण या चौकशीत जाणून-बुजून अनीयमीतता करून तक्रारदाराचे जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला.तक्रदाराचे नाव गोपनीय न ठेवता उलट रेल्वे कंत्रांटदाराला सुरक्षित ठेवून तक्रारदाराविरुद्धच गौण खनिज घेणार दोषी असा आदेश पारित करून आपापसात भांडण लाऊन प्रकरण बंद करण्याचा प्रकार केला व या प्रकरणातून पळ काढण्याचा प्रयत्न केला.हे प्रकरण एकमेकांवर ढकलून दोन वर्षापर्यंत टाईमपास केला. अनेक प्रकार पडद्याआड भूमिका घेऊन हमले करणे,खोटे केसेस करण्याची धमकी देणे असे प्रकार केले. या सर्व प्रकारची वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिखित तक्रार देऊनही कुठलीच कारवाई झालीनाही. गौणखनीज प्रकरणात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला असल्याने दोशींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व रेल्वे खात्याकडून सखोल चौकशी झाली असती तर हा करोड रुपयाचा भ्रष्टाचार उघडकीस आला असता पण असे न करता तक्रारदार पत्रकार यांना संपवण्याचा प्रयत्न करुण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.या प्रकरणात तक्रारदार पत्रकारावर झालेल्या अन्यायाचा निषेध करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित तहसीलदार व जिल्हाखनीकर्म अधिकारी आणी रेल्वे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या विषयाची निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यअध्यक्ष गजानन वाघमारे, यांचे उपस्थिती मध्ये राज्य उपाध्यक्ष शैलैश अलोणे,राज्यसचिव राजेश डांगटे,विभागीय संघटक गोपाल नारे, विभागीय उपाध्यक्ष अहमद शेख यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष अँड नरेंद्र बेलसरे,जिल्हा उपाध्यक्ष मनोहर गोलईत, जिल्हा सचीव संतोष ताकोते यांच्या आदेशाने तालुका अध्यक्ष शेख इमाम यांचे नेतृत्वाखाली श्याम ठक , संजय वाट , बाळकृष्ण उताने , जेठाभाई पटेल , बबन इंगळे , प्रीतेश गवई , निलेश इंगळे , दिलीप जाधव , राज कुमार ससाणे आदींच्या उपस्थिती मध्ये निवेदन देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे बार्शीटाकळी तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment