वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी नवनिर्वाचित तालुका कार्यकारीणीचे जल्लोषात स्वागत

वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी नवनिर्वाचित तालुका कार्यकारीणीचे जल्लोषात स्वागत 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी. 
अकोला जिल्हा व जिल्ह्यातील सातही तालुक्यातील कार्यकारीण्या दि.26/82022रोजी प्रसारित करण्यात आल्या. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये व प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनात कार्यकरीण्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे रतन आडे, तालुका अध्यक्षपदी तर अजय अराखराव यांची महासचिव पदी, संघटकपदी हरीश रामचवरे, सै रियासत यांची कोषध्यक्ष पदी तर मिलिंद करवते यांची प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती झाली. यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले. नियुक्ती झालेले पदाधिकारी एका दमाचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले असुन त्यांच्या निवडीचा जल्लोष वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी ने बायपास वर फटाके फोडुन नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे जल्लोषात स्वागत केले. 
 यावेळी बार्शिटाकळी वंचित बहुजन आघाडी चे जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनीक, नगरसेवक तथा गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाट, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, समाजसेवक अनिलभाऊ धुरंधर, प.स.सदस्य दादाराव पवार, बार असोसिएशनचे तालुका अध्यक्ष ऑड. राहुल जामनिक, अजहर पठाण, रूग्ण कल्याण समिती सदस्य ईमरान खान, तालुका निरीक्षक श्रीकृष्णा देवकुणबी, सनी धुरंधर, रक्षक जाधव, राजेंद्र दाईसकर, भुषण खंडारे, प्रविण वानखडे, मोहोड, आदी कार्यकर्ते उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे