वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न

वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न
अकोला प्रतिनिधी 
श्रध्देय ऑड बाळासाहेब आंबेडकर आणि आद. अंजलीताई आंबेडकर यांच्या आदेशानुसार पक्षाध्यक्ष मा. रेखाताई ठाकुर यांनी काल दि. २६ ऑगष्ट रोजी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या आठही तालुका कार्यकारिणी जाहीर केल्या. तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आज नवनियुक्त तालुका पदाधिकारी यांची तातडीची बैठक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांनी बोलावली होती. या बैठकीत पक्षाध्यक्ष मा. रेखाताई ठाकुर यांनी दिलेल्या निर्देशानुसार लवकरात लवकर उर्वरीत तालुका कार्यकारिणी व सर्कल कार्यकारिणी करण्याचे सोबतच पक्षाची शिस्त राखण्याचे आव्हान ह्या बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिले. त्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छ्याही देण्यात आल्या. या बैठकीला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष मा. पी. जे. वानखडे सर, जि. प. सुकाणु समिती सदस्य दिनकरराव खंडारे, पं. स. सभापती राजेश वावकार, उपसभापती आनंद डोंगरे, माजी सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, माजी जि. प. सदस्य पवन बुटे, संजय वाडकर, सुशील मोहोड, संजय तामकर, तेल्हारा शहराध्यक्ष विकास पवार, पं. स. गटनेते प्रा. संजय हिवराळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सन्माननीय तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे