रेल्वे स्टेशनवर बचत गटांना त्यांचा माल विक्रीसाठी दिले दुकान (जागा) उपलब्ध करून
*महिला आर्थिक विकास महामंडळाचा उपक्रम रेल्वे स्टेशनवर बचत गटांना त्यांचा माल विक्रीसाठी दिले दुकान (जागा) उपलब्ध करून
रेल्वे स्थानका वर सदर खाद्यपदार्थ विक्री केंद्रामुळे प्रवाशांना लाभ होणार तहसीलदार गजानन हांमंद
प्रतिनिधी बार्शीटाकळी
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय अकोला द्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र बार्शीटाकळी व नांदेड डिव्हिजन ऑफ साउथ सेंट्रल रेल्वे प्रॉऊडली प्रेझेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने आसरा माता महिला बचत गट विक्री केंद्र करिता बार्शीटाकळी रेल्वे स्टेशनवर जागा उपलब्ध करून दिली असता दिनांक 23 8 2022 रोजी खाद्यपदार्थ विक्री केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पाडले बार्शीटाकळी रेल्वे स्थानकावर विक्री केंद्र मिळण्या करिता भारतीय साउथ रेल्वेचे पवार साहेब व महिला आर्थिक विकास महामंडळाचे अकोला जिल्हा डि सी ओ वर्षाताई खोब्रागडे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. अकोला जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानकांवर महिला आर्थिक विकास महामंडळाचे खाद्यपदार्थांचे विक्री केंद्र व्हावे याबाबत चे सूचक जिल्हाधिकारी निमा अरोरा हे आहेत.
बार्शीटाकळी रेल्वे स्थानकावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमा चे उद्घाटन तहसीलदार गजानन हांमंद बार्शीटाकळी.यांचे हस्ते संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शालिनी सावरकर सीएमआरसी अध्यक्ष,रेणुका शेवलकार सचिव सि एम आर सी बार्शीटाकली नेहल समीर शेख व्यवस्थापक सि एम आर सी बार्शीटाकली भारतीय स्टेट बँक बार्शीटाकळी शाखा चे व्यवस्थापक राजेंद्र बागुल बँक ऑफ महाराष्ट्र बार्शीटाकळी शाखा चे व्यवस्थापक विजय शालीग्राम इंगळे एचडीएफसी बँक चे विजय अहिरकर सचिन पटवर्धन विकास अन्वेषण फाउंडेशन रत्नागिरी कोकण पाणी फाउंडेशन बार्शीटाकली तालुका समन्वयक संघपाल वाहूरवाघ
ज्येष्ठ पत्रकार जेठा भाई खेता भाई पटेल सोशल वर्कर शाहिद इकबाल खान सरफराज खान वकार खान
रेल्वे स्टेशन मास्टर सुषमा प्रभाकर पाकिडे या वेळी महिला आर्थिक विकास महा मंडळा चे अठरा गावाच्या गाव प्रतिनिधी उपस्थिती होती सदर कार्यक्रमाची प्रस्ताविका नहेल शेख व्यवस्थापक सीएमआरसी यांनी सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विना मोहोड यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी
करण्याकरिता बार्शीटाकळी चे सहयोगीनी उज्वलाताई इंगळे दुर्गाताई मुरतळकर अर्चना भांगे मालता चक्रे
सि आर पी देवकन्या भवाने.शिल्पा भातखडे शारदा भगत व ममता दासर आसरा माता गटाचे अध्यक्ष गटा चे महीला उपस्थित होतेया वेळी लेखापाल मोहन ताजणे व सर्व सहयोगिनी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला बार्शीटाकळी शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती बार्शीटाकळी रेल्वे स्थानक वर प्रथमच खाद्यपदार्थ विक्री केंद्राचे स्टॉल महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने उपलब्ध झाल्यामुळे शहरवासीयांच्या वतीने व रेल्वे परवाश्यांच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळ व रेल्वे दलाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment